WTC Final: ‘या’ खेळाडूंनी शतक ठोकलं की, भारताचा विजय झालाच म्हणून समजा!

सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात सर्व कसोटी सामनेच आहेत. अगोदर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि नंतर इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका भारत खेळणार आहे.

1/6
world test championship, world test championship final 2021, team india, prasidh krishna, India vs NewZealand, Virat Kohli,
क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजासह संघासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शतक. एका शतकामुळे सामना पलटला जातो आणि जर एखाद्या खेळाडूच्या शतकामुळे सामना जिंकलातर त्या खेळाडूवर कौतुकाचा वर्षावच होतो. असेच काही फलंदाज आहेत ज्यांच कसोटी सामन्यात शतक म्हणजे भारतीय संघाचा विजय पक्का असं समीकरणच होतं.यात विराट कोहली, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड किंवा महेंद्र सिंह धोनी यांच नाव नसून इतर दिग्गजांची नावे आहेत. (This Indian Cricketers Century brings win For Indian Cricket Team)
2/6
Sourav Ganguly
या यादीत सर्वात पहिला नाव म्हणजे इंडियन क्रिकेटचा 'दादा' अर्थात माजी कर्णधार सौरव गांगुलीच. ज्या सामन्यातही गांगुली शतक ठोकायच तो सामना भारत जिंकायचाच. गांगुलीने 16 वेळा कसोटी सामन्यात शतक ठोकलं असून त्या सर्व वेळी भारतच सामना विजयी झाला.
3/6
gundappa vishwanath
गांगुलीनंतर नाव येत भारताने स्टायलिश फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारे शामिल गुंडप्पा विश्वनाथ यांच. त्यांनी 14 कसोटी सामन्यांत शतकी खेळी केली आणि ते सर्व सामने भारतीय संघ विजयी झाला.
4/6
india vs england 2021, england tout india, ajinkya rahane, virat kohli, test series,
यानंतर नाव येत भारतीय कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच. रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलंय भारतीय संघाने पराभव पाहिलाच नाही. त्याने 12 कसोटी सामन्यांत शतक लगावले असून सर्व सामने टीम इंडिया जिंकली आहे.
5/6
Gautam Gambhir
भारतीय संघाला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या गौतम गंभीरचही नाव या यादीत आहे. गंभीरची बॅट जेव्हा जेव्हा चालते तेव्हा तेव्हा संघ विजयी होतो. कसोटीमध्येही गंभीरने शतक केल्यावर भारताचा विजय पक्का झाला आहे.
6/6
Former Pakistan Player RamiZ Raza on Rohit Sharma ICC World test Championship Final 2021
शेवटचं नाव येत सर्वांच्या लाडक्या हिटमॅनच. रोहित शर्माची कसोटी कारकीर्द एकदिवसीय कारकीर्दीऐवढी भारी नसली तरी त्याने जेव्हा शतक ठोकलंय, भारतीय संघ विजयी झालाय. त्याने आतापर्यंत 7 कसोटी शतकं ठोकली असून सर्व सामने भारत जिंकला आहे.