KKR vs RCB : “नियम तर….”, विराटला बाद देण्याच्या वादग्रस्त निर्णयावरुन कॅप्टन फाफ म्हणाला….

Faf Du Plessis KKR vs RCB IPL 2024 : कोलकाता विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या विराच कोहली याला आऊट देण्यावरुन वादाला तोंड फुटलंय. या निर्णयावरुन सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याने प्रतिक्रिया दिली आहे.

KKR vs RCB : नियम तर...., विराटला बाद देण्याच्या वादग्रस्त निर्णयावरुन कॅप्टन फाफ म्हणाला....
faf du plessis rcb ipl,
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Apr 21, 2024 | 9:58 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात केकेआर विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या विराट कोहली याला आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. हर्षित राणा याने टाकलेला बॉल विराटच्या कंबरेच्या बरोबर होता. विराटला अशा बॉलवर थर्ड अंपायरनेही आऊट दिलं. त्यामुळे विराटने भर मैदानाच फिल्ड अंपायरसह वाद घातला. इतकंच नाही, तर विराटने बॅटसह ग्लोव्हज फेकले. विराटच्या या कृतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराटला आऊट देण्याच्या निर्णयावरुन कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने आरसीबी 1 धावेने पराभूत झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

फाफ डुप्लेसी काय म्हणाला?

विराट कोहलीला फुलटॉसवर आऊट देण्यात आलं तेव्हा नॉन स्ट्राईक एंडवर स्वत: फाफ होता. विराटसह फाफनेही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र फाफ सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात. “नियम तर नियम आहे. विराट आणि मी हेच विचार करत होतो की बॉल कंबरेवर होतो. मात्र अशा परिस्थितीत निर्णयानंतर एक टीम आनंदी आणि दुसरी टीम नाखूश झालेली पाहायला मिळतं”, असं फाफ म्हणाला.

कोलकाता 1 धावेने विजयी

दरम्यान केकेआरने आरसीबीवर शेवटच्या बॉलवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. कॅप्टन श्रेयस अय्यर याच्या 50 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने केकेआरने 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 222 धावा केल्या. त्यामुळे आरसीबीला 223 धावांचं आव्हान मिळालं. आरसीबीनेही जोरदार प्रतिकार केला. रजत पाटीदार याने 52 आणि विल जॅक्स याने 55 धावांची खेळी केली. आरसीबीला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 3 धावांची गरज असताना लॉकी फर्ग्यूसन दुसरी धाव पूर्ण करतान रन आऊट झाला. त्यामुळे आरसीबीला 221 धावा करता आल्या. आरसीबीचा हा सलग सहावा पराभव ठरला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.