RR vs MI : यशस्वीचं नाबाद शतक, कॅप्टन संजू सॅमसनने विजयाचं श्रेय कुणाला दिलं?

RR vs MI : कॅप्टन संजू सॅमसन याने जॉस बटलर आऊट झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी विजयी भागीदारी केली.

RR vs MI : यशस्वीचं नाबाद शतक, कॅप्टन संजू सॅमसनने विजयाचं श्रेय कुणाला दिलं?
sanju samson rr vs mi ipl 2024,
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Apr 23, 2024 | 1:40 AM

संदीप शर्मा याने घेतलेल्या 5 विकेट्सनंतर यशस्वी जयस्वालने नाबाद शतक ठोकत राजस्थानला विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टॉप ऑर्डरमधील फलंदाज फ्लॉप ठरले. मुंबईची 4 बाद 52 स्थिती झाली. त्यानंतर नेहव वढेरा आणि तिलक वर्मा या दोघांनी 99 धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. मात्र त्यानंतर संदीप शर्मा आणि इतर सहकाऱ्यांनी मुंबईला झटपट धक्के दिले आणि 200 धावांपर्यंत जाण्यापासून रोखलं. मुंबईने राजस्थानसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं.

राजस्थानने विजयी धावांचा शानदार पाठलाग केला. यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या दोघांनी 74 धावांची सलामी भागीदारी केली. पीयूष चावलाने राजस्थानला पहिला झटका दिला. बटलर 25 बॉलमध्ये 35 धावा करुन आऊट झाला. बटलरनंतर कॅप्टन संजू सॅमसन मैदानात आला. या जोडीनेच राजस्थानला विजयी केलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. पृथ्वीने या दरम्यान आयपीएलच्या कारकीर्दीतील आणि मुंबई विरुद्धची एकूण दुसरी सेंच्युरी ठोकली. यशस्वीने 60 बॉलमध्ये 7 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर संजूने 2 सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 38 धावा केल्या. राजस्थानचा हा या हंगमातील 7 वा विजय ठरला. राजस्थानच्या या विजयानंतर संजूने विजायचं श्रेय कुणाला दिलं? तो काय म्हणाला? जाणून घेऊयात.

संजू सॅमसन काय म्हणाला?

विजयाचं श्रेय सर्व खेळाडूंना द्यावं लागेल. आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली. मध्ये डावखुऱ्यां फलंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी केली. आम्ही जिंकलो. खेळपट्टी कोरडी दिसत होती. लाईट्स सुरु झाल्यानंतर आणि थंडी वाढल्यानंतर दुसऱ्या डावात बॅटिंग करणं मदतशीर ठरतं. यशस्वीला काय करायंच आणि काय नाही, हे सांगायची गरज नाही. तो प्रोफशनल आहे. त्याला आत्मविश्वास आहे”, असं संजूने म्हटलं.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.