RR vs SRH : इशान किशनचा पत्ता कट, हैदराबादने कॅप्टन बदलला, आता कुणाकडे नेतृत्व?

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Toss and Playing 11 : सनरायजर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्या नेतृत्वा खेळणार आहे. हंगामी कर्णधार इशान किशन याने हैदराबादचं 7 सामन्यांत नेतृत्व केलं.

RR vs SRH : इशान किशनचा पत्ता कट, हैदराबादने कॅप्टन बदलला, आता कुणाकडे नेतृत्व?
Ishan Kishan and Abhishek Sharma Srh ipl 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2026 | 8:26 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (RR vs SRH) आमेसामने आहेत. राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील आठवा सामना आहे. राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि सनरायजर्स हैदराबाद चौथ्या स्थानी आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादने या सामन्यात राजस्थान विरुद्ध बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादचा कर्णधार बदलला

सनरायजर्स हैदराबादचा 19 व्या मोसमातील सातव्या सामन्यानंतर कर्णधार बदलण्यात आला आहे. हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे इशान किशन याला हंगामी कर्णधार या पदावरुन हटावं लागलं आहे. पॅटच्या कमबॅकसह हैदराबादचं नशिब पालटलं आहे. हैदराबादला इशान कॅप्टन असताना पहिल्या आणि सलग 7 सामन्यांत टॉस गमवावा लागला होता. मात्र पॅट येताच हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. पॅटने चेजिंगचा निर्णय घेतला आहे.

पॅट कमिन्सचं दुखापतीनंतर कमबॅक

पॅटला दुखापतीमुळे या मोसमातील पहिल्या 7 सामन्यांना मुकावं लागलेलं. मात्र आता पॅटच्या एन्ट्रीमुळे हैदराबादच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल झाला आहे. पॅटच्या एन्ट्रीमुळे दिलशान मधुशंका याला बाहेर व्हावं लागलं आहे. तर मराठमोळ्या प्रफुल याचा हर्ष दुबे याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर राजस्थानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

इशान किशन याच्या नेतृत्वात हैदराबादची कामगिरी

दरम्यान इशान किशन याच्या नेतृत्वात हैदराबादची समाधानकारक कामगिरी राहिली. इशानने हैदराबादचं एकूण 7 सामन्यांत नेतृत्व केलं. इशानने या 7 पैकी 4 सामन्यांत हैदराबादला विजयी केलं. तर हैदराबादला एकूण 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. ताज्या आकडेवारीनुसार, हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकटेकीपर), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे आणि एशान मलिंगा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा.

Follow Us