
ग्वेबेऱ्हा | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंट जॉर्ज पार्कमध्ये दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया पहिले बॅटिंग करत आहे. सूर्यकुमार यादव याची विदेशात टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सूर्यासाठी हा सामना खास आहे. सूर्याने दक्षिण आफ्रिकेतील आपल्या पहिल्याच टी 20 सामन्यात खास मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. सूर्याने टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सूर्यकमार यादव याने टी 20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. याबाबतीत त्याने विराटच्या रेकॉर्डची बरोबरी केलीय. सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी टी 20 क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या वेगवान 2 हजार धावा करणाऱ्या फलंदाज ठरलाय. सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 15 वी धाव पूर्ण करताच हा कारनामा केला. सूर्याने 56 टी 20 डावांमध्ये ही कामगिरी केली. विराटलाही 2 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 56 डावात खेळावं लागलं. तसेच सूर्यकुमार टीम इंडियाकडून टी 20 मध्ये 2 हजार धावा करणारा चौथा फलंदाजही ठरलाय.
तसेच टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 2 हजार रन्स करण्याचा रेकॉर्ड हा पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान याच्या दोघांच्या नावावर आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी 52-52 डावांमध्ये 2 हजार रन्स पूर्ण केल्या होत्या.
सूर्यकुमार यादव याच्या 2 हजार टी 20आय धावा
Milestone 🔓
2⃣0⃣0⃣0⃣ T20I runs (and going strong 💪💪) for Suryakumar Yadav! 👏 👏
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/lK1n7BvpzQ
— BCCI (@BCCI) December 12, 2023
बाबर आझम – 52 डाव
मोहम्मद रिझवान – 52 डाव
विराट कोहली – 56 डाव
सूर्यकुमार यादव – 56 डाव*
केएल राहुल – 58 डाव
विराट कोहली – 4 हजार 8 धावा.
रोहित शर्मा – 3 हजार 853 धावा.
केएल राहुल – 2 हजार 256 धावा.
सूर्यकुमार यादव – 2 हजार धावा*
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.