SA vs IND 3rd T20I Toss | दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, कॅप्टन सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय

South Africa vs India 3rd T20i Toss | दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. पाहा टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण आहे.

SA vs IND 3rd T20I Toss | दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, कॅप्टन सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय
| Updated on: Dec 14, 2023 | 8:22 PM

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टी 20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याचं आयोजन हे जोहान्सबर्ग येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौला गेला. कॅप्टन एडन मारक्रम याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेसमोर विजयी आव्हान उभं करावं लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डीएलएसनुसार 5 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकला लागणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचे फलंदाज कशाप्रकारे बॅटिंग करतात याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

घातक बॉलरची एन्ट्री

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकूण 3 बदल केले आहेत. ट्रिस्टन स्ट्रब्स याच्या जागी डोनोव्हन फरेरा याला स्थान देण्यात आलं आहे. नांद्रे बर्गर याला टीम मॅनेजमेंटने पदार्पणाची संधी दिली आहे. तर धोकादायक केशव महाराज परतला आहे. याच केशव महाराजने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनुभवी फलंदाजांना अडकवलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर केशव महाराजच्या 4 ओव्हर खेळून काढणं आव्हानात्मक ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.