10 किलो रक्त झालं कमी…! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनावर सचिन-विराटने व्यक्त केल्या भावना

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे. क्रिकेट जगतातही त्यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी धर्मेंद्र यांना भावुक श्रद्धांजली वाहिली आहे.

10 किलो रक्त झालं कमी...! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनावर सचिन-विराटने व्यक्त केल्या भावना
10 किलो रक्त झालं कमी...! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांच्या निधनावर सचिन-विराटने व्यक्त केल्या भावना
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 24, 2025 | 7:40 PM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि हिमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलं. संपूर्ण देशात त्यांच्या प्रेम करणारा एक चाहता वर्ग होता. या भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि रनमशिन्स म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहली यांनी बॉलिवूडच्या दिग्गज कलाकाराच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. सचिन तेंडुलकरने त्यांच्या आठवणींना उजाळा देताना शरीरातील 10 किलो रक्त कमी झाल्याचं सांगितलं. विराट कोहलीनेही एक्सवर लिहिताना सांगितलं की, बॉलिवूडने एक एक खरा आयकॉन गमावला आहे.

सचिन तेंडुलकर आणि धर्मेंद यांचं एक वेगळं नातं होतं. क्रिकेट आणि रूपेरी पडद्याव्यतिरिक्त हे दोन दिग्गज एकमेकांचे चाहते होते. धर्मेंद्र यांची आठवण काढताना सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर लिहिलं की, ‘इतर सर्वांप्रमाणेच, मी धर्मेंद्रला एक असा अभिनेता म्हणून पाहिले आहे की ते त्याच्या प्रतिभेने आमचे मनोरंजन करत होते. मी त्यांचा लगेच चाहता झालो. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा पडद्याबाहेरचे नाते अधिक घट्ट झाले. त्याची ऊर्जा अद्भुत होती आणि ते मला नेहमी म्हणायचे की, तुला पाहून माझं रक्त एक किलोने वाढते. त्यांच्यात एक अशी उबदारता होती ज्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या सर्वांनाच खूप खास वाटायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, त्यांचे चाहते नसणे अशक्य होते. आज त्यांच्या जाण्याने माझ्यावर खूप मोठा भार पडला आहे. असे वाटते की मी 10 किलो रक्त कमी केले आहे. मला तुमची खूप आठवण येईल.’

2021 मध्ये धर्मेंद्रने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मसचिन तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्याने फोटोला कॅप्शन देत लिहिले होते की, “आज विमानात देशाचा अभिमानी सचिनशी माझी अचानक भेट झाली. मी जेव्हा जेव्हा सचिनला भेटलो तेव्हा तो नेहमीच माझ्या लाडक्या मुलासारखा वागतो. सचिन चिरंजीव होवो, तुला खूप खूप प्रेम.”

विराट कोहली यानेही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गमावले आहे, ज्याने आपल्या प्रतिभेने मने जिंकली. एक खरा आदर्श ज्याने त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा दिली. या कठीण काळात भगनन त्याच्या कुटुंबाला शक्ती देवो. संपूर्ण कुटुंबाप्रती माझी मनापासून संवेदना.’