AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SCO vs IRE: हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूने 32 चेंडूत आयर्लंडला मिळवून दिला विजय

SCO vs IRE: कसली तुफान बॅटिंग केली, 32 चेंडूत त्याने 72 धावा ठोकल्या.

SCO vs IRE: हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूने 32 चेंडूत आयर्लंडला मिळवून दिला विजय
ireland team Image Credit source: twitter
| Updated on: Oct 19, 2022 | 3:39 PM
Share

मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) च्या 7 व्या सामन्यात स्कॉटलंडच्या टीमने 176 धावा बनवल्या. पण तरीही त्यांचा पराभव झाला. आयर्लंडच्या टीमने (SCO vs IRE) स्कॉटलंडला 6 विकेटने हरवलं. कर्टिस कॅम्पर (curtis campher) आयर्लंडच्या विजयाचा नायक ठरला. 32 चेंडूत त्याने 72 धावा ठोकल्या. कर्टिस शिवाय जॉर्ज डॉकरेलने 27 चेंडूत 39 धावा केल्या. या दोन फलंदाजांनी 119 धावांची भागीदारी केली. त्यांच्या बळावर 6 चेंडू बाकी राखून आयर्लंडने स्कॉटलंडवर विजय मिळवला.

चार चेंडूत चार विकेट

कर्टिस कॅम्पर फक्त बॅटिंगच नाही, बॉलिंगमध्येही जलवा दाखवला. या मीडियम पेस बॉलरने 2 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. कर्टिस कॅम्परने टी 20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेतली आहे. 2021 टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅम्परने नेदरलँडस विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. चार चेंडूत चार विकेट घेण्याचा कारनामा त्याने केला होता.

मायकल जोंसची इनिंग वाया

स्कॉटलंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा मंसे 1 रन्सवर आऊट झाला. मायकल जोंस आणि क्रॉसने अर्धशतकी भागीदारी करुन स्कॉटलंडचा डाव सावरला. कॅप्टन बॅरिंग्टन 37 धावांची इनिंग खेळला. मायकल जोंसने आक्रमक बॅटिंग केली. त्याने शानदार अर्धशतक झळकावलं. जोंसने 55 चेंडूत 86 धावा चोपल्या. त्याच्या इनिंगमुळे स्कॉटलंड एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

आयर्लंडची जबरदस्त फलंदाजी

आयर्लंडने खराब सुरुवात केली होती. त्यांचा कॅप्टन एंड्रयू बलर्बिनी 14 आणि पॉल स्टर्लिंग 8 धावांवर आऊट झाला होता. लॉर्कन टकर 20 आणि हॅरी टॅक्टर 14 धावांवर आऊट झाला. आयर्लंडने 10 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावले होते. आयरिश टीम मॅच हरणार असं वाटत होतं. पण कर्टिस कॅम्परने फक्त 32 चेंडूत सामना फिरवला. त्याने जॉर्ज डॉकरेलसोबत शतकी भागीदारी केली.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....