
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने एप्रिल 2010 मध्ये पाकिस्तानी ऑलराऊंडर शोएब मलिकसोबत लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. इजहान त्याचं नाव असून तो दोन वर्षांचा आहे. हसन आली आणि शामिया प्रमाणे हे जोडपं सुद्धा भारत-पाकिस्तानशी संबंधित आहे.

पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीन अक्रमने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियाच्या शनीर अक्रमसोबत लग्न केलं. शनीराही दिसायला खूप सुंदर आहे.

मोहम्मद हफीज आणि नाजियाने 2007 मध्ये लग्न केलं. नाजिय सोशल मीडियावर खूपच Active असते. तिच्या पोस्टवरुन ती क्रिकेटची खूप मोठी फॅन असल्याचं समजतं.

मोहम्मद आमिरने नरजिस खातून बरोबर 2016 मध्ये लग्न केलं. नरजिस एक ब्रिटिश-पाकिस्तानी मुलगी आहे. मोहम्मद आमिर डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. लंडनमध्ये तुरुंगवास भोगत असताना नरजिस खातून आणि मोहम्मद आमिरची ओळख झाली.

शामिया आरजूने 2019 मध्ये हसन अली बरोबर दुबईत लग्न केलं. हरियाणामध्ये राहणारी शामियाना अमीरात एयरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनियर आहे. शामियाच कुटुंब मूळच दिल्लीचं आहे. या दोघांची ओळख दिल्लीमध्ये झाली होती.