Shane Warne Demise: विश्वास नाही बसणार! शेन वॉर्नच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील

| Updated on: Mar 05, 2022 | 11:08 AM

Shane Warne Demise: शेन वॉर्न (Shane Warne) हा क्रिकेट विश्वातील एक जादूई लेगस्पिनर होता. काल अचानक वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नने या जगातून एक्झिट घेतली. शेन वॉर्नचं निधन सर्वसामान्य क्रिकेट चाहत्याच्या मनाला चटका लावणारं आहे.

Shane Warne Demise: विश्वास नाही बसणार! शेन वॉर्नच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील
शेन वॉर्न
Image Credit source: Facebook
Follow us on

सिडनी: शेन वॉर्न (Shane Warne) हा क्रिकेट विश्वातील एक जादूई लेगस्पिनर होता. काल अचानक वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नने या जगातून एक्झिट घेतली. शेन वॉर्नचं निधन सर्वसामान्य क्रिकेट चाहत्याच्या मनाला चटका लावणारं आहे. शुक्रवारी चार मार्चला थायलंडच्या एक व्हिलामध्ये (Thailand villa) शेन वॉर्नने अखेरचा श्वास घेतला. 1992 मध्ये शेन वॉर्नच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीयरला सुरुवात झाली. शेन वॉर्नला स्वत:ची ओळख प्रस्थापित करायला फार वेळ लागला नाही. अगदी निवृत्त होईपर्यंत (Retirement) शेन वॉर्नचं नाव क्रिकेट चाहत्यांच्या ओठावर होतं. कारण शेन वॉर्नकडे फिरकी गोलंदाजीची कलाच तशी होती. शेन वॉर्नने काही विकेट अशा घेतल्यात की, समोरच्या फलंदाजालाही कळलं नाही. आजही त्या विकेट पाहिल्यानंतर क्रिकेट चाहते थक्क होऊन जातात.

ब्रँड व्हॅल्यू असलेला क्रिकेटर

मैदानातील दमदार प्रदर्शनाच्या बळावर शेन वॉर्नने मैदानाबाहेरही भरपूर पैसा कमावला. शेन वॉर्नचे उत्पनाचे आकडे पाहिल्यानंतर डोळे विस्फारतील. भारतीय क्रिकेटपटूंव्यतिरिक्त असे काही निवडक क्रिकेटर्स आहेत, ज्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे. शेन वॉर्नचा त्या क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो.

बिझनेसमध्ये गुंतवणूक

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही शेन वॉर्नची ब्रँड व्हॅल्यू कायम होती. त्या आधारावर त्याने भरपूर पैसा कमावला. 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय करीयरनंतर शेन वॉर्न अनेक वर्ष फ्रेंचायजी क्रिकेटही खेळला. कोचिंग, कॉमेंट्री मध्ये व्यस्त होता. निवृत्तीनंतरही अनेक मोठ्या स्पोर्ट्स चॅनलसाठी त्याने क्रिकेट एक्सपर्ट म्हणून काम केलं. त्यातून त्याने भरपूर पैसाही कमावला. अनेक उत्पादनांची त्याने जाहीरात केली. वेगवेगळ्या बिझनेसमध्ये गुंतवणूक केली.

कशी कमावली इतकी संपत्ती?

शेन वॉर्नकडे उत्पन्नाचे अनेक मार्ग होते. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे. शेन वॉर्नच्या एकूण संपत्तीचा विचार केल्यास, सेलिब्रिटींच्या संपत्तीची माहिती देणाऱ्या ‘सेलिब्रिटी नेट वर्थ’ वेबसाइटनुसार ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज लेगस्पिनरकडे 50 मिलियन डॉलर म्हणजे 381.86 कोटींची संपत्ती आहे. ऑस्ट्रेलियन संघ, आयपीएल, कॉमेंट्री, जाहीरात आणि अन्य बिझनेसमधून त्याने ही संपत्ती कमावली आहे. 145 कसोटी सामन्यात शेन वॉर्नने एकूण 708 विकेट घेतल्या. 1999 सालच्या ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचाही शेन वॉर्न सदस्य होता.