IND vs PAK: अंतिम फेरीत शिवम दुबे पार पाडली मोठी जबाबदारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण या सामन्यात हार्दिक पांड्या नसल्याने रिंकु सिंहला संधी मिळाली. पण एक गोलंदाज शॉर्ट पडला होता. पण शिवम दुबेने ही जबाबदारी पार पाडली.

IND vs PAK: अंतिम फेरीत शिवम दुबे पार पाडली मोठी जबाबदारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच असं घडलं
IND vs PAK: अंतिम फेरीत शिवम दुबे पार पाडली मोठी जबाबदारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 28, 2025 | 8:51 PM

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना होत आहे. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्या नसल्याने टीम इंडियाला प्लेइंग 11 मध्ये बदल करावा. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेचं कमबॅक झालं. पण हार्दिक पांड्याची जागा भरून काढणं खूपच कठीण होतं. प्रशिक्षक आणि कर्णधार अर्शदीप सिंगला गोलंदाजी मजबूत करण्याची संधी देतील अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही.त्याच्या ऐवजी संघात फलंदाज रिंकु सिंहला स्थान दिलं. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण आता पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कोण करणार असा प्रश्न होता. पण ही जबाबदारी शिवम दुबेने पार पाडली. आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत कधीही त्याला अशी संधी मिळाली नव्हती. पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावर अशी जबाबदारी सोपवली. शिवम दुबेने अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध डावातील पहिले षटक टाकले. त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीत नव्या चेंडूने पहिलं षटक टाकलं.

हार्दिकने आशिया कप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात टीम इंडियासाठी गोलंदाजीत सुरुवात केली होती. पण त्याच्या गैरहजेरीत बुमराह गोलंदाजीची सुरुवात करेल अशी अपेक्षा होती. पण कर्णधार सूर्याने शिवमची निवड केली आणि त्याला नवीन चेंडू दिला.शिवम दुबेने पहिलं षटक टाकलं. या षटकातील पहिले चार चेंडू त्याने निर्धाव टाकले. त्यानंतर पाचव्या चेडूवर साहिजाबाद फरहानने चौकार मारला. त्यानंतर सहावा चेंडू पुन्हा निर्धाव टाकला. अशा पद्धतीने त्याने पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या. त्याने त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा तिसरं षटकं सोपवलं. या षटकात देखील त्याने पाकिस्तानी संघावर दबाव टाकला. या षटकात त्याने फक्त 8 धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानला पॉवर प्लेमध्ये फार काही धावा करता आल्या नाहीत. पॉवर प्लेच्या सहा षटकात पाकिस्तानने बिन बाद 45 धावा केल्या.

शिवम दुबेने 2016 मध्ये त्याच्या टी20 कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण पहिलं षटकं टाकण्याची त्याची पहिलीच वेळ होती. आता शिवम दुबेचा पुढच्या काही सामन्यात विचार केला जाऊ शकतो. हायव्होल्टेज सामन्यात इतक्या शांतपणे षटक टाकणं ही मोठी गोष्ट आहे.