सानिया मिर्झाच्या नवऱ्यावरुन पाकिस्तान क्रिकेटमध्ये जोरदार पॉलिटिक्स, थेट बाबर आजमवर आरोप

पाकिस्तानने काल T20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडली. पण या टीममध्ये शोएब मलिकची निवड झालेली नाही. त्यावरुन पाकिस्तान क्रिकेटमध्ये गदारोळ सुरु आहे.

सानिया मिर्झाच्या नवऱ्यावरुन पाकिस्तान क्रिकेटमध्ये जोरदार पॉलिटिक्स, थेट बाबर आजमवर आरोप
Shoaib-MalikImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 2:49 PM

मुंबई: पाकिस्तानने काल T20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडली. पण या टीममध्ये शोएब मलिकची निवड झालेली नाही. त्यावरुन पाकिस्तान क्रिकेटमध्ये गदारोळ सुरु आहे. फॅन्स आणि माजी क्रिकेटर्सची दोन भागांमध्ये विभागणी झालीय. शोएब मलिक टीममध्ये हवा होता, असं पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे. शोएब मलिक टीममध्ये असता, तर बाबर आजमला सपोर्ट मिळाला असता.

या दरम्यान एक प्रश्न निर्माण झालाय. शोएब मलिकवर त्याच टि्वट तर भारी पडलं नाही ना? आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानी टीमच्या पराभवानंतर त्याने हे टि्वट केलं होतं.

बाबर आजमवर उपस्थित केलं होतं प्रश्नचिन्ह

आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. पराभवानंतर शोएब मलिकने टि्वटकरुन बाबर आमजवर निशाणा साधला होता. ‘आपण मैत्री, आवडता-नावडता या संस्कृतीमधून कधी बाहेर येणार?’ असा सवाल शोएबने विचारला होता. प्लेइंग इलेव्हन निवडताना बाबर आमजने मैत्रीला पहिलं प्राधान्य दिलं, असा फायनल हरल्यानंतर बाबर आजमवर आरोप झाला होता.

शोएब मलिकला असं टि्वट करण्याजी गरज नव्हती, असं माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने म्हटलं आहे. त्याने थोडी प्रतिक्षा केली पाहिजे होती, असं आफ्रिदी म्हणाला. टी 20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा होणं बाकी होतं. शोएब मलिकला टीममध्ये स्थान मिळालं पाहिजे होतं. त्याचा अधिकार होता. तो जगभरात क्रिकेट खेळला आहे. सर्वात जास्त फिट आणि अनुभवी आहे. तो खेळला किंवा बेंचवर बसला, तरी बाबर आजमला भरपूर सपोर्ट मिळाला असता, असं आफ्रिदी म्हणाला.

फखर झमन सुद्धा बाहेर

पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्ड कप टीममधून फखर झमन आणि हसन अलीला ड्रॉप करण्यात आलय. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्यूनियरने टीममध्ये पुनरागमन केलय. दुखापतीमुळे दोघे आशिया कप स्पर्धेत खेळू शकले नाहीत. शान मसूदला पाकिस्तानी टीममध्ये संधी मिळाली आहे. तो अजून एकही टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.