VIDEO: Sania Mirza च्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच, शोएब मलिकने मुलासाठी केली ‘ही’ गोष्ट

शोएब मलिकने जे केलं, त्यामुळे मुलगाही खूश

VIDEO: Sania Mirza च्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच, शोएब मलिकने मुलासाठी केली ही गोष्ट
sania-shoaib
| Updated on: Dec 05, 2022 | 4:15 PM

लाहोर: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत सानियाचा 2010 साली निकाह झाला. मागच्या काही दिवसांपासून मीडियामध्ये सानिया आणि शोएब विभक्त होणार असल्याची चर्चा सुरु आहेत. सानिया आणि शोएब यांनी याबद्दल अजूनपर्यंत काहीही भाष्य केलेलं नाही. सानिया आणि शोएब या जोडप्याला एक मुलगा आहे. दोघेही त्याच्यावर भरपूर प्रेम करतात.

जगातल्या महागड्या गाड्यांमध्ये लॅम्बोर्गिनी

शोएब मलिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. शोएब मुलाला लॅम्बोर्गिनीमधून फिरवत असल्याचा हा व्हिडिओ आहे. जगातल्या महागड्या गाड्यांमध्ये लॅम्बोर्गिनीची गणना होते. शोएब मलिक सध्या पाकिस्तानी टीममध्ये नाहीय. शोएबने बाबर आजमला अनेक गोष्टी सुनावल्या आहेत. त्यामुळे तो पाकिस्तानी टीममध्ये नाहीय.

मुलाला सोबत घेऊन लाँग ड्राइव्ह

शोएब मलिक अनेक देशात टी 20 लीगमध्ये खेळतो. लंका प्रीमियर लीगमध्येही तो खेळणार आहे. ही लीग खेळण्यासाठी रवाना होण्याआधी त्याने आपल्या मुलासोबत काही वेळ घालवला. शोएब मलिकने टि्वटरवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. मुलासोबत तो लॅम्बोर्गिनी कारमध्ये दिसला.


2010 साली लग्न

सानिया आणि शोएबच 2010 साली लग्न झालं. त्याआधी काहीवेळ दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. या दोघांच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत. सानिया आणि शोएब सध्या वेगळे रहातायत. शोएब मलिकच नाव एका पाकिस्तानी मॉडेलसोबत जोडलं जातय. सानियाने 2018 साली मुलाला जन्म दिला. त्यामुळे ती काही काळ टेनिसपासून दूर होती.