टी-20 विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, हा खेळाडू संघाबाहेर
टी-20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के बसत आहे.

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INS vs SA) आज टी 20 (T20) सीरीजमधला शेवटचा सामना सुरु आहे. सामना सुरु होण्यापूर्वी पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मानं एक मोठी घोषणा केली आणि यामुळे टीम इंडियाची चिंता आणखी वाढली आहे. टी-20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वी पाठीच्या दुखण्यामुळे जसप्रीत बुमराह संघाबाहेर गेलाय. त्यात आता आणखी एका खेळाडूनं दगा दिली आहे.
हे ट्विट पाहा
अर्शदीप सिंग संघाबाहेर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं की, अर्शदीप सिंग पाठीच्या दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. या रोहित शर्माच्या माहितीमुळे आणखी टेन्शन वाढलं आहे.
रोहित म्हणाला की, अर्शदीपला त्याच्या पाठीत काही समस्या असल्यानं तो खेळू शकणार नाही. हा एक सावधगिरीचा उपाय आहे, काहीही गंभीर नाही, असंही रोहित म्हणालाय.
टीम इंडियाचे प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेचा खेळ-11
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.