AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 T20 सामन्यात 204 धावा फटकावल्यानंतर कप्तान श्रेयस अय्यरचं KKR च्या फॅन्सना वचन, म्हणाला…

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयस अय्यरची नजर आता आयपीएल 2022 च्या चषकावर आहे. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सशी झालेल्या एका खास संभाषणात म्हणाला, "आयपीएल 2022 जिंकण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेन."

3 T20 सामन्यात 204 धावा फटकावल्यानंतर कप्तान श्रेयस अय्यरचं KKR च्या फॅन्सना वचन, म्हणाला...
Shreyas Iyer - KKRImage Credit source: KKR INSTAGRAM
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 28, 2022 | 11:14 PM
Share

मुंबई : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रेयसने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने सलग तीन अर्धशतक झळकवली. श्रेयसच्या या कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटसमोर संघ निवडीचा पेच वाढणार आहे. खरंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघ व्यवस्थापनही T-20 वर्ल्डकपसाठी संघ निवड करताना अशा प्रकारच्या डोकेदुखीमुळे आनंदी असेल. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. तिन्ही सामन्यात तो नाबाद राहिला. आक्रमकतेबरोबरच परिस्थिती ओळखून खेळण्याचं भानही श्रेयसच्या फलंदाजीत दिसून आलं. विराटच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, त्याचा श्रेयसने पुरेपूर फायदा उचलला. दरम्यान, श्रेयसला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयस अय्यरची नजर आता आयपीएल 2022 च्या चषकावर आहे. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सशी झालेल्या एका खास संभाषणात म्हणाला, “आयपीएल 2022 जिंकण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेन.” कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 16 फेब्रुवारीला श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले होते. श्रेयस अय्यरला लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 12.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. कोलकात्याने या खेळाडूची केलेली निवड श्रेयसने नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेत सार्थ ठरवली. हा खेळाडू अप्रतिम फॉर्ममध्ये आहे तसेच त्याच्या कर्णधारपदाची चुणूक सर्वांनी याआधीच पाहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या गेल्या दोन वर्षांमधील यशात अय्यरचा मोठा वाटा आहे.

श्रेयस अय्यर केकेआरशी झालेल्या संवादादरम्यान म्हणाला, “मी मैदानात उतरायला तयार आहे. यावेळी मी केकेआरकडून खेळणार आहे. जेव्हाही मी या संघाविरुद्ध खेळलो तेव्हा चाहत्यांचं या संघावर किती प्रेम आहे ते मी पाहिलं आहे. यावेळी मी या संघाचा कर्णधार असेन आणि स्टेडियम आमचा उत्साह वाढवेल. मी जबाबदारीसाठी तयार आहे आणि मला चॅम्पियनशिप जिंकायची आहे.”

केकेआरमधील वातावरण बदलेन : अय्यर

श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधारपदाबाबत खास गोष्ट सांगितली. अय्यर म्हणाला, “मी खेळाडूंचा कर्णधार आहे. सर्व खेळाडू एकाच ध्येयाचा विचार करतील असे वातावरण मला निर्माण करायचे आहे. मी केकेआरमध्ये वेगळ्या मानसिकतेसह येत आहे कारण आता माझ्याकडे अधिक अनुभव आहे आणि माझ्याकडे पूर्वीपेक्षा चांगले नेतृत्वगुण आणि निर्णय घेण्याचे कौशल्य आहे. अय्यर म्हणाला की केकेआरने मला विकत घेतल्याने मी खूप आनंदी आहे. मी त्या दिवशी लिलाव पाहत होतो. केकेआर फ्रँचायझी सुरुवातीपासूनच मला विकत घेण्यासाठी पुढे होती. आम्ही सर्व खेळाडू एकत्र बसून लिलाव पाहत होतो. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. केकेआरने मला विकत घेतल्याचा मला आनंद आहे.”

इतर बातम्या

IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO

Mohammed Shami on Trolling: ‘ते खरे भारतीय नाहीत’, धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली