AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या T 20 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलं. भारताने ही मालिका (Indian Cricket Team) 3-0 ने जिंकली. याआधी भारताने वेस्ट इंडिजला 3-0 ने हरवलं होतं.

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला 'या' श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट
रोहित शर्मा या श्रीलंकन गोलंदाजासमोर पुन्हा फेल Image Credit source: bcci photo
| Updated on: Feb 28, 2022 | 1:18 PM
Share

धर्मशाळा: भारताने श्रीलंकेविरुद्धच्या T 20 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलं. भारताने ही मालिका (Indian Cricket Team) 3-0 ने जिंकली. याआधी भारताने वेस्ट इंडिजला 3-0 ने हरवलं होतं. या दोन मालिकांच्या निमित्ताने रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातत्याने यशस्वी कामगिरी करत आहे. रोहितने रविवारी पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली व संघाला विजय मिळवून दिला. कॅप्टन म्हणून रोहित शर्मा जितका यशस्वी वाटतोय, तितका फलंदाज म्हणून तो अपयशी आहे. हे सुद्धा या मालिकेचं एक वास्तव आहे. रोहित अवघ्या पाच रन्सवर आऊट झाला. रोहित बद्दल अन्य संघाच्या गोलंदाजांच्या मनात एक धाक आहे. पण एक गोलंदाजाला रोहितची अजिबात भिती वाटत नाही. उलट रोहितच त्याला थोडा दचकून रहात असावा. कारण कालच्या सामन्यातही त्याच गोलंदाजाने रोहितची विकेट काढली. त्याचं नाव आहे. दुष्मंथा चमीरा. (Dushmantha Chameera)

रोहितने काल मैदानावर पाऊल ठेवताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. रोहितचा हा 125 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना होता. रोहित टी-20 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेटपटू बनला आहे. त्याने पाकिस्तानच्या शोएब मलिकला मागे टाकलं. पण कालच्या सामन्यात फलंदाज म्हणून रोहित अपयशी ठरला.

चमीराच्या चेंडूवर फसला रोहित

रोहित शर्मा या सामन्यात संजू सॅमसनसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याने पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बिनरु फर्नांडोला चौकार मारला. पण पुढच्याच षटकात तो बाद झाला. चमीराचा चेंडू थोडा जास्त उसळला. चेंडू बॅटची कड घेऊन हवेत उडाला. करुणारत्नेने रोहितची कॅच घेण्यात कुठलीही चूक केली नाही. टी 20 इंटरनॅशनलमध्ये चमीराने रोहितला बाद करण्याची ही सहावी वेळ होती.

दुसऱ्या सामन्यातही चमीरानेच रोहितला बोल्ड केलं होतं. चमीराने पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहितच्या यष्टया वाकवल्या होत्या. रोहित त्या सामन्यात फक्त एक रन्सवर आऊट झाला होता. पहिल्या टी 20 मध्ये रोहितने 44 धावा केल्या होत्या.

indian cricket team captain rohit sharma once again got out on sri lanka bowler dushmantha chameera

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.