Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना सुरू असून सध्या टी20 संघाचा कर्णधार आराम करत आहे. असं असताना श्रेयस अय्यरसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका चाहत्याने सेल्फी घेताना काय केलं बघा? त्यामुळे श्रेयस अय्यरची रिएक्शन व्हायरल झाली आहे.

Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
Image Credit source: video grab/Twitter
| Updated on: Aug 25, 2026 | 5:33 PM

भारतीय टी20 संघाचा कर्णधार सध्या आराम करत आहे. कारण भारत श्रीलंका कसोटी मालिका सुरू असून त्या संघाचा भाग नाही. त्यामुळे मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद श्रेयस अय्यर लुटत आहे. असं असताना बँकॉक एअरपोर्टवरील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्न करत होता. यासाठी त्याने श्रेयस अय्यरकडे मागणीही केली. पण चाहत्याच्या एक कृतीमुळे श्रेयस अय्यर वैतागलेला दिसला. पण त्यानंतर त्याने शांततेत हे प्रकरण हाताळलं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बँकॉक एअरपोर्टवरचा असल्याचं बोललं जात आहे. तसेच क्रीडाप्रेमी, श्रेयस अय्यरचे चाहते आणि टीकाकार आपआपल्या पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

एअरपोर्टवर श्रेयस अय्यरसोबत काय झालं?

एअरपोर्ट टर्मिनलवर क्रिकेटपटू श्रेयस अय्यर विमानाची वाट पाहात बसला होता. तेव्हा तिथे एका चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. पण असं करत असताना त्या व्यक्तीने श्रेयस अय्यरची बॅग लांब केली. तसेच श्रेयस अय्यरच्या बाजूला बसला. पण त्या व्यक्तीची कृती पाहून श्रेयस अय्यर हैराण झाला आणि बॅगकडे पाहू लागला. श्रेयस अय्यरने लगेच बॅग मागितली. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने सॉरी बोलून ती बॅग त्याच्याकडे सरकवली. या स्थितीत श्रेयस अय्यर सुरूवातीला वैतागलेला दिसला, पण त्यानंतर शांतपणे हे प्रकरण हाताळलं. त्यामुळे त्याच्या कृतीचं कौतुक होत आहे.

श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानापासून सध्या तरी दूर आहे. पण सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. 13 सप्टेंबरपासून भारत अफगाणिस्तान टी20 मालिका होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये होणार आहेत. ही कसोटी मालिका भारतात होत असली तरी त्याचं यजमानपद अफगाणिस्तानकडे आहे. दुसरं, हे मालिके 3-0 ने जिंकण्याचं मोठं आव्हान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघावर असेल. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ विजयी ट्रॅकवर आला आहे.

Follow Us