
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्याआधी जवळपास महिन्याभराआधी 24 मे रोजी बीसीसीआय टीम मॅनेजमेंटने नव्या भारतीय कसोटी कर्णधाराची घोषणा केली. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. शुबमन गिल यासह टीम इंडियाचा 37 वा कसोटी कर्णधार ठरला. शुबमन इंग्लंड दौऱ्यातून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. कॅप्टन्सीला काटेरी मुकूट म्हणतात. कॅप्टन्सीच्या दबावात अनेक खेळाडू फ्लॉप ठरतात. तसेच अपेक्षित कामगिरीही करता येत नाही. सचिन तेंडुलकर आणि एलिस्टर कूक या दिग्गज क्रिकेटपटूंना कर्णधार म्हणून काही खास करता आलं नाही. तर दुसर्या बाजूला विराट कोहली आणि ग्रॅमी स्मिथ या दोघांनी कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली. त्यामुळे शुबमनसमोर कर्णधार म्हणून विराट आणि स्मिथसारखी कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. या निमित्ताने विराट आणि स्मिथ यांनी केलेली कामगिरी कशी होती? तर सचिन आणि कूक कसे कमी पडले? हे जाणून घेऊयात. ...