IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शुबमन गिलची एन्ट्री! कसं काय ते जाणून घ्या

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलला दुखापत झाली होती. त्यामुळे वनडे मालिकेला मुकला आणि कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवलं. आता टी20 मालिकेत खेळणार की नाही याबाबत चर्चा सुरु असताना एक बातमी समोर आली आहे.

IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शुबमन गिलची एन्ट्री! कसं काय ते जाणून घ्या
IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शुबमन गिलची एन्ट्री! कसं काय ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
Updated on: Dec 03, 2025 | 4:01 PM

शुबमन गिलच्या गैरहजेरीत टीम इंडियाला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिल्या कसोटीत टीम इंडिया 10 खेळाडूंसह उतरली होती. एक फलंदाज शॉर्ट असताना टीम इंडियाला 30 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या कसोटीत पंतकडे नेतृत्व सोपवलं गेलं. पण त्यातही अनुभवाची उणीव जाणवली आणि भारताचा 2-0 असा दारूण पराभव झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून शुबमन गिलकडे वनडे संघाची धुरा सोपवली गेली. मात्र दुखापतीमुळे गिल या स्पर्धेला मुकला आणि कर्णधारपदाची भूमिका केएल राहुलकडे आली. आता टी20 मालिकेत खेळणार की नाही याबाबत क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला होता. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची ही महत्त्वाची मालिका आहे. असं असताना शुबमन गिलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बंगळुरुच्या सेंटर फॉर एक्सिलेंसने त्याला फिट घोषित केलं आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रिटायर्ड आऊट होण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यानंतर त्याच्यावर सेंटर फॉर एक्सिलेंसमध्ये देखरेख सुरू होती. त्यात आता दुखापतीतून सावरला असून त्याला फिट घोषित केलं आहे. त्यामुळे टी20 मालिकेत त्याच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे त्याची निवड पक्की असल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, निवडकर्त्यांची रायपूर वनडे सामन्यापूर्वी एक बैठक पार पडली. त्यात शुबमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. इतर खेळाडूंच्या नावाची घोषणा बुधवारी संध्याकाळपर्यंत केली जाण्याची शक्यता आहे.

आशिया कप स्पर्धेपासून शुबमन गिलकडे संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सोपवली गेली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही हीच जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे, टी20 फॉर्मेटमध्ये शुबमन गिलचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. कारण आशिया कप स्पर्धेतही खास करू शकला नव्हता. ऑस्ट्रेलिया मालिकेतही धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे टी20 संघात शुबमन गिलची जागा होत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. पण त्याच्याकडे भविष्याचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. अशा स्थितीत त्याला संधी दिली जात असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, शुबमन गिलमुळे संजू सॅमसनला ओपनिंग सोडणं भाग पडलं आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत क्रमवारीत काय फरक पडतो का हे पाहणं औत्सु्क्याचं ठरेल.