SL vs AFG | अँजलो मॅथ्यू याची विध्वंसक खेळी, अफगाणिस्तानसमोर 188 धावांचं आव्हान

Sri Lanka vs Afghanistan 2nd T20I | अँजलो मॅथ्युज याने अखेरच्या काही षटकांमध्ये वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 187 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी हा करो या मरो सामना आहे.

SL vs AFG | अँजलो मॅथ्यू याची विध्वंसक खेळी, अफगाणिस्तानसमोर 188 धावांचं आव्हान
| Updated on: Feb 20, 2024 | 12:58 AM

दांबुला | अनुभवी ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज याने अखेरच्या क्षणी केलेल्या नाबाद विंध्वंसक खेळीच्या जोरावर श्रीलंकेने अफगाणिस्तानला दुसऱ्या टी 20 सामन्यात विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं आहे. अँजलो मॅथ्यूज याने अखेरीस 22 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 187 धावा करता आल्या.श्रीलंकेकडून सदीरा समराविक्रमा याने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तर पाथुम निसांका याने 25, विकेटकीपर कुसल मेंडीस याने 23, धनंजया डी सिल्वा 14, कॅप्टन वानिंदू हसरंगा 22 आणि असलंका याने 4 धावा केल्या.

अफगाणिस्तानने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगाठी भाग पाडलं. श्रीलंकेच्या पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस या दोघांनी 45 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानने श्रीलंकेने ठराविक अंतराने झटके दिले. त्यानंतर श्रीलंकेने पुन्हा सहाव्या विकेटसाठी सदीरा समरविक्रमा आणि अँजलो मॅथ्यूज या दोघांनी 66 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यामुळेच श्रीलंकेला 180 धावांच्या पार मजल मारता आली.

अफगाणिस्तानसाठी ‘करो या मरो’

दरम्यान अफगाणिस्तानसाठी दुसरा टी 20 सामना हा करो या मरो असा आहे. श्रीलंका या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. श्रीलंकेने पहिला सामना हा 4 विकेट्सने जिंकला. त्यामुळे आता अफगाणिस्तानला मालिकेतील आव्हान कायम ऱाखण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

अफगाणिस्तानसमोर 188  धावांचं आव्हान

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | वानिंदू हसरंगा (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, बिनुरा फर्नांडो आणि मथीशा पाथिराना.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला ओमरझाई, हजरतुल्ला झझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फझलहक फारुकी.