Test Cricket : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर टीम कसोटी मालिकेसाठी सज्ज, 29 जानेवारीपासून पहिला सामना, माजी कर्णधाराकडे नेतृत्व

Cricket News : बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. जाणून घ्या सर्वकाही.

Test Cricket : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर टीम कसोटी मालिकेसाठी सज्ज, 29 जानेवारीपासून पहिला सामना, माजी कर्णधाराकडे नेतृत्व
virat kohli and steven smith
Image Credit source: AFP
| Updated on: Jan 28, 2025 | 12:17 PM

ऑस्ट्रेलियाने मायदेशात टीम इंडियावर बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांची मालिका ही 3-1 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने यासह 10 वर्षांची प्रतिक्षा संपवत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर आता कांगारु नववर्षातील पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया श्रीलंकेत ही कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप 2023-2025 या साखळीतील शेवटची मालिका आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर विजय मिळवत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली आहे. तर श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचा 2025 वर्षाची सुरुवात मालिका विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमधील स्थान आणखी भक्कम करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे.

धनंजया डी सिल्वा हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ हा या मालिकेत कांगारुंचं नेतृत्व करणार आहे. पॅट कमिन्स या मालिकेचा भाग नाही. त्यामुळे स्टीव्हनला ही जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही संघांची गेल्या 5 सामन्यांमधील कामगिरी ही आसपास सारखीच आहे. ऑस्ट्रेलियाने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 2 वेळा मैदान मारलं आहे. त्यामुळे श्रीलंका आता मायदेशात कांगारुंविरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना टीव्हीवर-मोबाईलवर कुठे पाहता येईल?

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना टीव्हीवर कुठे दाखवण्यात येणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.

श्रीलंका टीम : धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, ओशादा फर्नांडो, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, असिथा फर्नांडो, सदीरा वानरे, व्हॅन समरावी निशाण पेरीस, सोनल दिनुषा, लाहिरू उदारा आणि मिलन प्रियनाथ रथनायके.

ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन मॅकस्विनी, टॉड मर्फी आणि कूपर कॉनोली.