SL vs BAN: मुश्फिकुर रहीममुळे बांगलादेश झटका, कोलंबोत काय झालं?

Sri Lanka vs Bangladesh, 2nd Test : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना सिंहली स्पोर्ट्स कल्ब, कोलंबो येथे खेळवण्यात येत आहे.

SL vs BAN: मुश्फिकुर रहीममुळे बांगलादेश झटका, कोलंबोत काय झालं?
SL vs BAN Test Cricket
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 26, 2025 | 12:27 AM

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याने पहिल्या दिवशी क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. रहीमला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. रहीमने निराशाजनक कामगिरी केली आणि निर्णायक क्षणी आऊट झाला. रहीमने पहिल्या डावात 5 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. श्रीलंकेचा फिरकीपटू सोनल दिनुशा याने रहीमला आऊट केलं. बांगलादेशने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट्स गमावून 220 रन्स केल्या.

मुशफिकुर मोठी खेळी करण्यात अपयशी

मुशफिकुर याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगरी केली होती. मुशफिकुरने दीडशतकी खेळी केली होती. मुशफिकुरने पहिल्या सामन्यात 163 रन्स केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा बांगलादेश टीम आणि चाहत्यांना होती. मात्र मुशफिकुरला दुसऱ्या सामन्यात तसं करणं जमलं नाही. बांगलादेशने मुशफिकुरच्या रुपात 160 धावांवर सहावी विकेट गमावली. मुशफिकुरने सोनल दिनुशाच्या बॉलिंगवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मुशफिकुरचा हा फटका निट बसला नाही आणि विश्वा फर्नांडो याने कॅच घेतला.

श्रीलंकेने पहिल्या दिवस यशस्वीरित्या स्वत:च्या नावावर केला. त्यामुळे श्रीलंकेचा दुसऱ्या दिवशीही बांगलादेशला बॅकफुटवर ठेवण्याचा प्रयत्न असेल. आता यात किती यश मिळतं? हे दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतरच स्पष्ट होईल. बांगलादेशसाठी पहिल्या डावात आतापर्यंत शादमन इस्लाम याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शादमनने 46 धावा केल्या. तर मोमिनुल हक याने 21 रन्स केल्या. रहीम व्यतिरिक्त बांगलदेशकडून पहिल्या कसोटीत नजमुल शांतो यानेही शतक केलं होतं. मात्र शांतोने इथे निराशा केली. शांतो 8 धावा करुन बाद झाला. लिटन दास याने 34 धावा जोडल्या. तर मेहदी हसन मिराज याने 31 रन्स केल्या.

पहिला दिवस श्रीलंकेच्या नावावर

श्रीलंकेची कडक कामगिरी

श्रीलंकेकडून विश्वा फर्नांडो, आसिथा फर्नांडो आणि सोनल दिनुशा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. सामन्यातील दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. श्रीलंकेचा सामन्यावर घट्ट पकड मिळवण्याचा प्रयत्न असेल. तर बांगलादेशचं कमबॅक करण्याकडे लक्ष असणार आहे. बांगलादेशकडून इबादत हुसैन 5 तर तैजुल इस्लाम 9 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे या जोडीने निर्णायक भागीदारी करुन टीमला 300 पर्यंत पोहचवावं, अशी आशा बांगलादेश समर्थकांना असणार आहे.