मोठी बातमी! पुतिन यांचा दौरा सुफळ, भारतानं घेतला अमेरिकेला हादरवणारा निर्णय, ट्रम्प यांना जबर धक्का
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, मात्र या टॅरिफ दबावाला झुगारून आता भारतानं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, जो की ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अमेरिकेकडून भारतावर वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. रशियाकडून भारतानं तेल खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे. अमेरिकेकडून त्यासाठी भारतावर 50 टक्के टॅरिफ देखील लावण्यात आला आहे. तसेच अनेकदा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा देखील केला आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहे, याबाबत भारतानं आपल्याकडे भूमिका देखील स्पष्ट केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे हे सर्व दावे तसेच अमेरिकेनं भारतावर निर्माण केलेला टॅरिफ दबाव कुचकामी ठरल्याचं आता समोर आलं आहे. हा अमेरिकेसाठी भारतानं दिलेला सर्वात मोठा झटका मानला जात आहे. मोठी बातमी समोर आली आहे.
भारतानं अमेरिकेचा टॅरिफ दबाव असताना देखील रशियाकडून तेल खरेदीमध्ये एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे, भारताची रशियामधून कच्च्या तेलाची खरेदी वाढतच आहे. यासोबतच आता समुद्री मार्गानं रशियाचं तेल आयात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश बनला आहे, भारतानं याबाबतीत चीनला देखील मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या गोष्टी अशा परिस्थितीमध्ये घडत आहेत. जेव्हा भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेनं भारतावर प्रचंड टॅरिफ दबाव टाकला आहे. अमेरिकेनं भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे, त्यामुळे आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तुंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे.
नव्या शिप ट्रॅकिंग डेटा अनुसार या डिसेंबर महिन्यामध्ये भारतानं रशियाकडून विक्रमी तेलाची आयात केली आहे, गेल्या सहा महिन्यांमधील ही सर्वोच्च तेल आयात ठरली आहे. अमेरिकेनं रशियावर लावलेले प्रतिबंध आणि भारतावर टाकलेला टॅरिफ दबावाला भारताकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून रशियाकडून तेलाच्या खरेदीचं प्रमाण हे वाढतच राहिलं आहे. तसेच दुसरीकडे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी देखील आपण भारताला कधीही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तेलाचा पुरवठा कमी पडू देणार नसल्याचं म्हटलं आहे.
