AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेनंतर या देशाने भारतावर लावला थेट 50 टक्के टॅरिफ, मोठा भूकंप, चीनही…

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताकडून पर्यायी मार्गांचा शोध घेतला जात आहे. काहीही करून हे नुकसान भारताला भरून काढायचे आहेत. त्यामध्ये अजून एका देशाने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

अमेरिकेनंतर या देशाने भारतावर लावला थेट 50 टक्के टॅरिफ, मोठा भूकंप, चीनही...
tariff
| Updated on: Dec 11, 2025 | 1:02 PM
Share

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. यामुळे अमेरिकेत होणारी जवळपास निर्यात बंद झाली. भारताकडून या टॅरिफमधून मार्ग काढली जात आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हा टॅरिफ लावला, असे अमेरिकेने म्हटले. आता भारतासाठी एक अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी आहे. अमेरिकेच्या टॅरिफसोबत भारत चार हात करत असतानाच अमेरिकेनंंतर मेक्सिकोनेही भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावला, तशी घोषणा मेक्सिकोकडून करण्यात आली. मेक्सिकन सिनेटने या उपाययोजनाला मान्यता दिली आहे. मेक्सिकोचे म्हणणे आहे की, या टॅरिफमुळे स्थानिक उद्योगांना मोठी बळकटी मिळेल. हा निर्णय आमच्या नागरिकांसाठी फायदेशीर नक्कीच ठरेल. मेस्किकोने भारतासह काही देशांना अत्यंत मोठा धक्का नक्कीच दिला आहे.

मेक्सिकोच्या या निर्णयामुळे आता कपडे, कापड, मोटारी, ऑटो पार्ट्स, प्लास्टिक आणि स्टीलच्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लागेल. चीन आणि स्थानिक व्यावसायिक गटांच्या विरोधानंतर हे पाऊल उचलण्यात आले. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्यातील एक मुक्त व्यापार करार आहे. 1 जुलै 2o2o रोजी लागू झाला. अमेरिकेच्या दबावाखाली किंवा अमेरिकेच्या सांगण्यावरूनच हा टॅरिफ मेक्सिकोने लावल्याचे सांगितले जाते.

मेक्सिकन सरकारचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे स्वस्त आयातीमुळे स्थानिक कंपन्यांवर येणारा दबाव कमी होईल आणि त्यांचे नुकसानही होणार नाही. देशांतर्गत उद्योगाला एक नवी ऊर्जा मिळेल. हा निर्णय इतर देशांतील निर्यातदार आणि स्थानिक व्यावसायिक गटांसाठी एक मोठा धक्का नक्कीच आहे. मेक्सिकोमध्ये निर्यात होणाऱ्या गोष्टींवर त्याचा थेट परिणाम होईल. मेक्सिकोने केलेल्या दर वाढीमुळे आयातीचा खर्च लक्षणीयरीत्या वाढेल.

मेक्सिकोने लावलेल्या टॅरिफचा थेट परिणाम भारतासह चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि थायलंडला होईल. कारण या देशाचे मेक्सिकोसोबत व्यापार करार नाहीत. भारतातूनही मेक्सिकोमध्ये अनेक वस्तूंची निर्यात केली जाते. आता 50 टक्के टॅरिफ लागणार असल्याने मोठे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागेल. यामुळे होणारी निर्यात कमी होण्याचे थेट संकेत आहेत. अमेरिकेनंतर भारताला मेक्सिकोने मोठा धक्का दिल्याचे यावरून स्पष्ट होते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी.
कुणालाही न दुखवता तपोवन वृक्षतोडीवर अण्णा हजारे स्पष्ट बोलले..
कुणालाही न दुखवता तपोवन वृक्षतोडीवर अण्णा हजारे स्पष्ट बोलले...
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.