SL vs NZ 1st Test: श्रीलंका सहाव्या दिवशी विजयी, न्यूझीलंडवर 63 धावांनी मात

Sri Lanka vs New Zealand 1st Test Match Result And Highlights In Marathi: श्रीलंकेने न्यूझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यातील सहाव्या दिवशी 63 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. श्रीलंकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

SL vs NZ 1st Test: श्रीलंका सहाव्या दिवशी विजयी, न्यूझीलंडवर 63 धावांनी मात
sl vs nz 1st test
Image Credit source: AFP
| Updated on: Sep 23, 2024 | 3:29 PM

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील गाले येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल सहाव्या दिवशी लागला आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडवर 63 धावांनी विजय मिळवला आहे. उभयसंघातील सलामीच्या सामन्याला 18 सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. मात्र 23 सप्टेंबर रोजी अर्थात सहाव्या दिवशी सामन्याचा निकाल लागला. श्रीलंकेला विजयासाठी सहाव्या दिवशी विजयासाठी 2 विकेट्सची गरज होती. तर न्यूझीलंड विजयापासून 68 धावा दूर होती. मात्र न्यूझीलंडने 5 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स गमावल्या आणि श्रीलंकेने विजय मिळवला.

भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा अष्टपैलू रचीन रवींद्र याच्याकडून मोठी आशा होती. पाचव्या दिवशी रचीन 91 आणि एजाज पटेल 0* धावांवर नाबाद परतले. सहाव्या दिवशी श्रीलंकेचा स्पीनर प्रभाथ जयसूर्या याने झटपट 2 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला 211 धावांवर रोखलं. प्रभाथने रचीन रवींद्र आणि त्यानंतर विल्यम ओरुर्के याल आऊट केलं. श्रीलंकेत 21 सप्टेंबरला राष्ट्रपती पदासाठी मतदान होतं. त्यामुळे दोन्ही संघांना विश्रांती दिली गेली. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ हा 22 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला.

सामन्याबाबत थोडक्यात

श्रीलंकेने पहिल्या डावात 305 धावा केल्या. न्यूझीलंडने प्रत्युत्तरात 340 धावा केल्या. त्यामुळे किवींना 35 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 309 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 275 धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकेकडून प्रभाथ जयसूर्या याने एकूण 9 विकेट्स घेतल्या. प्रभाथने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 विके्टस घेतल्या. तर श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने याने 83, दिनेश चांदीमल याने 61 आणि अँजलो मॅथ्यूजने 50 धावांची खेळी करत निर्णायक योगदान दिलं.

न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात रचीन रवींद्र याने 92 धावांचं योगदान दिलं. केन विलियमसन आणि टॉम ब्लंडल या दोघांनी प्रत्येकी 30 धावा केल्या. टॉम लॅथमने 28 धावा केल्या. न्यूझीलंडकडून या चौघांव्यतिरिक्त दुसऱ्या डावात एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. प्रभाथ जयसूर्या याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

श्रीलंकेची विजयी सुरुवात

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज,  कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साउथी (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.