या गावातील ७० टक्के तरुण सायबर गुन्हेगार, जणू दुसरा ‘जामतारा’, पोलिसांनी आता…
देवसेरस गावातच नाही आजूबाजूच्या अनेक गावात सायबर ठकांचे समानांतर नेटवर्क सक्रीय आहे. परंतू या सर्व नेटवर्कचे संचालन मुख्य रुपाने देवसेरस गावातून होते. यामुळे याला झारखंडच्या जामताडा म्हटले जाते.

मथुरा येथील गोवर्धनाच्या कणा-कणात भगवान श्रीकृष्ण वसले आहेत. परंतू ही पवित्र धरती गेल्या दोन दशकांपासून ठगाचा अड्डा बनली आहे. येथील देवसेरस, मोडसेरस, मंडौरा आणि नगला मेव गावातले शेकडो तरुण शॉर्टकटने श्रीमंत होण्यासाठी ठकसेन झाले आहेत. गुरुवारी मथुरा पोलिसांनी भल्या पहाटे देवसेरस गावात छापा टाकला तेव्हा गावात हाहाकार उडाला. सकाळ झाली नव्हती आणि अचानक पोलिसांच्या बुटांचे खाडखाड आवाज घुमू लागले. क्षणात अनेक ऑफीसर आणि शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांनी या गावाला घेरले. पोलिसांनी सुमारे ४२ लोकांना ताब्यात घेतले आहे. तर १२० ठग शेतातून पसारही झाले.
मथुराच्या गोवर्धन येथे २० वर्षांहून अधिक काळापासून टटलू गँग सक्रीय आहे. या गँगने आतापर्यंत हजारो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. आधी ही गँग स्वस्तातल्या सोन्याची लालूच दाखवून लोकांना बोलवयाचा आणि त्यानंतर त्यांना लुटायचा.काळानंतर या ठकसेनांनी आपली पद्धत बदलली आणि गेल्या एक दशकापासून संघटीत सायबर फ्रॉडच्या नेटवर्कमध्ये ही गँग सक्रीय झाली आहे.आता ही टोळी फेसबुक आणि इस्टाग्राम आयडी हॅक करण्यापासून बँक खात्याचा ओटीपी आणि अन्य डिटेल मिळवून घोटाळे करत आहे.
गोवर्धनच्या देवसेरस गावात टोळी सक्रीय
गोवर्धनच्या देवसेरस गाव संपूर्ण सायबर फ्रॉडचे नेटवर्कचे केंद्र आहे. गावातील ७० टक्के लोक कोणत्या ना कोणत्या फ्रॉडमध्ये गुंतले आहेत. यात मोठ्या संख्येने मेव समुदायाचा समावेश आहे. येथे संचालित गँगचे सदस्य गावाच्या बाहेर राहून फ्रॉडचे नेटवर्क चालवतात. आणि पोलिसांची कारवाई वाढली की दुसऱ्या राज्यात पळून जातात.
२० वर्षांपूर्वी ही गँग पितळला सोने सांगून लोकांना स्वस्त सोन्याचे आमीष दाखवून गावात बोलवायचा आणि रस्त्यात त्यांना लुटायचा. कोणाकडे लिफ्ट मागून त्या कारच्या चालकाला संपवायचे. जर त्याच्याकडून पैसे मिळाले नाही तर त्यांना ओलीस ठेवून त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागायचा.बिल्डर, व्यापारी आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांना टार्गेट करायचे.
आता एका दशकापासून या टोळीने डिजिटल जगात पाऊल ठेवले आहे. सायबर फ्रॉड करताना सोशल मीडिया अकाऊंटचे आयडी हॅक करुन कोणाच्या तरी नावाने पैसे मागणे, बँक कर्मचारी किंवा कंपनीचे प्रतिनिधी बनून कॉल करणे आणि ओटीपी मिळवले आणि बँक खाली करणे यांचे प्रमुख मार्ग बनले आहेत.
एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की गेल्या २० वर्षांपासून टटलूबाजीचे काम होत आहे.सायबर फ्रॉडतर आता चार ते पाच वर्षांपासून सुरु आहे.या गावात बेरोजगारी जास्त असल्याने तरुणांनी हा मार्ग निवडला आहे.
पहिल्यादा मथुरात एवढी मोठी कारवाई
पोलिसांनी गुरुवारी देवसेरस गावात आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या ऑपरेशनच्या आधी पोलिसांनी मोठी योजना आखली. चार आयपीएस अधिकारी,चार सीओ, २६ इन्स्पेक्टर आणि सुमारे ४०० पोलिस आणि पीएसचे जवान या पथकात सामील होते. कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने झाली. पोलिसांच्या गाड्या गावापासून दूरवर पार्क करण्यात आल्या.आणि जवान शेतातील बांधावरुन चालत गावात घुसले. आणि छापामारी सुरु होताच गावात खळबळ उडाली.
पोलिसांनी या मोहिमेत एकूण ४० लोकांना अटक केली आहे. तर १२० आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. हे आरोपी शेजारील हरयाणा आणि राजस्थानच्या दिशेने पळाले आहेत. कार गावातून या राज्याची सीमा पार करण्यास एक मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे या आरोपींचा पाठलाग करणे पोलिसांना कठीण जात असते.
