Vaibhav Suryavanshi याचं SMAT स्पर्धेत वादळी शतक, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

Vaibhav Suryavanshi SMAT Century : वैभव सूर्यवंशी याने वयाच्या 14 वर्षी अवघ्या 58 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वैभवचं टी 20 कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. तसेच वैभवने या शतकासह खास विक्रम त्याच्या नावावर केला.

Vaibhav Suryavanshi याचं SMAT स्पर्धेत वादळी शतक, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Vaibhav Suryavanshi Smat Century
Image Credit source: PTI
Updated on: Dec 02, 2025 | 5:55 PM

कमी वयात विविध स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभवने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 (SMAT) स्पर्धेत शतकांचं खातं उघडलं आहे. वैभवला या स्पर्धेतील 3 सामन्यांमध्ये काही खास करता आलं नाही. मात्र वैभवला महाराष्ट्र विरुद्ध सूर गवसला. वैभवने बिहारकडून या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपवली. वैभवने सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं. वैभवने या खेळीत जितके चौकार लगावले तितकेच षटकारही ठोकले. वैभवने शतक पूर्ण करण्यासाठी 58 चेंडूंचा सामना केला.

बिहारची बॅटिंग

वैभव सूर्यवंशी याने  केलेल्या शतकी खेळीमुळे बिहारला 170 पार मजल मारता आली. बिहारने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. महाराष्ट्राचे गोलंदाज वैभवला आऊट करण्यात अपयशी ठरले. वैभवने नॉट आऊट 108 रन्स केल्या. वैभवने 61 बॉलमध्ये 177 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. वैभवने या दरम्यान 7 चौकार आणि 7 षटकार लगावले.

महाराष्ट्रने टॉस जिंकून बिहारला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बिहारकडून ओपनिंगला वैभव आणि बिपीन सौरभ ही जोडी मैदानात आली. मात्र हे दोघे बिहारला चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरले. बिपीन 4 रन्सवर आऊट झाला. पीयूष सिंग यालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पीयूषने 7 धावा केल्या.

त्यानंतर वैभव आणि आकाश राज या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी 55 बॉलमध्ये 70 रन्स केल्या. मात्र आकाश राज आऊट होताच ही जोडी फुटली. आकाश 14 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर आऊट झाला. आकाशने 30 धावा केल्या. आकाश आऊट झाल्याने बिहारचा स्कोअर 3 आऊट 101 असा झाला.

बिहारच्या 3 विकेट्स गेल्यांनतर वैभवने गिअर बदलला. वैभवने धावा करण्याचा वेग वाढवला. वैभवने फटकेबाजीच्या जोरावर शतकापर्यंत मजल मारली. वैभवने चौथ्या विकेटसाठी आयुष लोहरुका यासह 39 बॉलमध्ये 75 रन्सची पार्टनरशीप केली. बिहारने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 3 आऊट 176 रन्स केल्या.

वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी

वैभव सर्वात युवा फलंदाज

दरम्यान वैभवने या शतकी खेळीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. वैभव 14 व्या वर्षी 3 टी 20 शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच वैभवने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारा सर्वात युवा फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला. वैभवने 14 वर्ष 250 व्या दिवशी ही कामगिरी केली.