37 षटकार- 18 चौकार, 120 चेंडूत 349 धावा, बडोदा टीमचा हाहाकार, टी 20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Highest Total In T20 History : बडोदा क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीमध्ये अनेक रेकॉर्ड उद्धवस्त केले आहेत. बडोदाने सिक्किमविरुद्ध 37 षटकार आणि 18 चौकारांच्या मदतीने 120 चेंडूत 349 धावा ठोकल्या.

37 षटकार- 18 चौकार, 120 चेंडूत 349 धावा, बडोदा टीमचा हाहाकार, टी 20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
Baroda Cricke team
| Updated on: Dec 05, 2024 | 12:08 PM

बडोदा क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीमध्ये इतिहास घडवला आहे. बडोदाने इंदूरमधील एमराल्ड हाय स्कूल ग्राउंडवर सिक्कीम विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. कृणाल पंड्या याच्या कॅप्टन्सीत बडोदाने टी 20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. बडोदाने सिक्कीम विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 349 धावा केल्या आहेत. बडोदाने या दरम्यान 37 षटकार आणि 18 चौकार ठोकले. याआधी कोणत्याही संघाला टी 20 क्रिकेटमध्ये इतकी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचता आलं नव्हतं.याआधी झिंबाब्वेच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम होता. झिंबाब्वेने गांबियाविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 344 धावा केल्या होत्या.

बडोदाची बॅटिंग

बडोदाकडून तिसऱ्या स्थानी आलेल्या भानू पानिया याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. भानूने 51 बॉलमध्ये 262.75 च्या स्ट्राईक रेटने 15 गगनभेदी सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 134 रन्स केल्या. तसेच ओपनर शाश्वत रावत याने 4 चौकार आणि 4 षटकारांसह 43 धावांची खेळी केली. तर अभिमन्यू सिंह याने 5 सिक्स आणि 4 फोरसह 53 रन्स केल्या. या सलामी जोडीमुळे बडोदाला चांगली सुरुवात मिळाली.

तसेच शिवालिक शर्मा याने अवघ्या 17 चेंडूत 55 धावांची खेळी केली. शिवालिकने या खेळीत 6 षटकार आणि 3 चौकार लगावले. विष्णू सोलंकी याने 16 बॉलमध्ये 5 सिक्स 2 फोरसह 50 धावा केल्या. बडोदाने यासह टी 20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेतील गेल्या हंगामात पंजाबने सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला होता. पंजाबने आंध्रविरुद्ध 275 धावा केल्या होत्या.

बडोदाची तुफानी खेळी

टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या

बडोदा : 349-5 विरुद्ध सिक्किम.
झिंबाब्वे : 344-4 विरुद्ध गांबिया.
नेपाळ : 314-3 विरुद्ध मंगोलिया.
टीम इंडिया : 297-6 विरुद्ध बांगलादेश

बडोदा प्लेइंग इलेव्हन : कृणाल पंड्या (कर्णधार), शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, भानू पानिया, शिवालिक शर्मा, विष्णू सोलंकी (विकेटकीपर), अतित शेठ, महेश पिठिया, चिंतल गांधी, राज लिंबानी आणि निनाद अश्विनकुमार रथवा.

सिक्कीम प्लेइंग इलेव्हन : ली योंग लेपचा (कर्णधार), प्रणेश छेत्री, नीलेश लामिचने, आशिष थापा (विकेटकीपर), तरुण शर्मा, पालझोर तमांग, अंकुर मलिक, रोशन कुमार, पार्थ पलावत, रॉबिन लिंबू आणि मोहम्मद सप्तुल्ला.