AB de Villiers : एबी डीव्हीलियर्सचं कमबॅक, दक्षिण आफ्रिकेच्या या संघांकडून खेळणार

World Championship Of Legends 2025 : दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज 'मिस्टर 360' खेळाडू एबी डिव्हिलियर्स हा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेला 18 जुलैपासून सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स टीम या स्पर्धेत एकूण 5 साखळी सामने खेळणार आहे.

AB de Villiers : एबी डीव्हीलियर्सचं कमबॅक, दक्षिण आफ्रिकेच्या या संघांकडून खेळणार
ab de villiers and virat kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 25, 2025 | 9:40 PM

भारतीय क्रिकेट संघाला 24 जून रोजी इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता 25 जूनपासून वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2025 या स्पर्धेसाठी (World Championship Of Legends 2025) दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात मिस्टर 360 अशी ओळख असलेल्या एबी डी व्हीलियर्स याचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेनिमित्ताने पुन्हा एकदा एबीची चौफेर फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.

एबी पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज

एबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. एबीने अनेकदा दक्षिण आफ्रिकेला एकहाती सामने जिंकून दिले. मात्र एबीने फार आधी निवृत्ती घेतली. एबीला डोळ्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटला वेळेआधी अलविदा करावा लागला. मात्र आता एबी पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज झाला आहे.

एबी व्यतिरिक्त साऊथ आफ्रिका चॅम्पियन्स टीममध्ये दिग्गज हाशिम आमला, ख्रिस मॉरिस, जेपी ड्युमिनी, इमरान ताहीर आणि इतर दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

हर्षित तोमर काय म्हणाले?

“सर्व खेळाडूंनी पुन्हा एकदा एकत्र येऊन टीमसाठी क्रिकेट खेळणं, असा डब्ल्यूसीएलचा (WCL) अर्थ आहे. एबी डीव्हीलियर्स कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. एबीसोबत हाशिम आमला आणि ख्रिस मॉरिस यासारखेही खेळाडू आहेत. सर्व चाहते या स्पर्धेची सुरुवात होण्याची वाट पाहत आहेत”, असं वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स टूर्नामेंटचे संस्थापक आणि सीईओ हर्षित तोमर म्हणाले.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स 2025 या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका 19 ते 27 जुलै दरम्यान एकूण 5 सामने खेळणार आहे. तर 31 जुलै रोजी उपांत्य फेरीतील 2 सामन्यांच्या थरार रंगेल. तर 2 ऑगस्टला महाविजेता निश्चित होईल.

माजी दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार

साऊथ आफ्रिका चॅम्पियन्सचं वेळापत्रक

विरुद्ध वेस्टइंडिज चॅम्पियन्स, 19 जुलै

विरुद्ध इंडिया चॅम्पियन्स, 22 जुलै

विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स, 24 जुलै

विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स, 25 जुलै

विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, 27 जुलै

उपांत्य फेरीतील दोन्ही सामने 31 जुलै

अंतिम सामना 2 ऑगस्ट