बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी ‘नो बॉल’वरून वाद, तिसऱ्या पंचांच्या निर्णयाने आश्चर्य
ऑस्ट्रेलिया इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात नो बॉल वरून वादाला फोडणी मिळाली. या चेंडूवर मिचेल स्टार्क झेल बाद झाला. त्यामुळे पंचांच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मेलबर्न येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यातील एक वादग्रस्त निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी 20 विकेट पडल्या. त्यात नो बॉलबाबत घेतलेल्या निर्णयामुळे एक विकेट गेली. इंग्लंडकूडन ब्रायडन कार्स गोलंदाजी करत होता. समोर फलंदाजीला मिचेल स्टार्क होता. ऑस्ट्रेलियाची स्थिती 7 गडी बाद 142 अशी होती. तेव्हा स्टार्कने उंच फटका मारला आणि मिड ऑफला असलेला बेन स्टोक्सने मागे धावत जात झेल पकडला. त्यामुळे मिचेल स्टार्क तंबूच्या दिशेने जाऊ लागला. पण मेलबर्न क्रिकेट मैदानातील स्क्रिनवर साइड ऑन रिप्ले दाखवला गेला. तेव्हा मैदानातील प्रेक्षकांनी कार्सने नो बॉल टाकल्याचं जोरात ओरडू लागले. फॉक्स क्रिकेटच्या मते, जेव्हा मिचेल स्टार्क तंबूत जात होता तेव्हा ब्रॉडकास्ट रिप्लेत कार्सचा पुढचा पाय पॉपिंग क्रिजच्या पुढे जात असल्याचं दिसलं. त्यामुळे नो बॉल असल्याचं सर्वांना वाटलं.
तिसऱ्या पंचांनी एक दोनदा रिप्ले पाहिला आणि सांगितलं की, कार्सचा पहिल्यांदा पाय पडला तेव्हा तो लाइनच्या मागे होता. तसेच त्यांनी हा चेंडू फेअर डिलिव्हरी असल्याचं सांगितलं. त्यामुळे स्टार्कला बाद होत तंबूत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण पंचांच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. मार्क वॉने सांगितलं की, ‘मला दिसत नाही की त्याच्या पायाचा कोणताही भाग लाइनच्या मागे आहे. जर माझे डोळे खराब नसतील तर.. त्यामुळे मला हे मान्य नाही. मला ते दिसत नाही.’
Bad umpiring is bad cricket Mitchell Starc given out off a blatant no ball -= not even close to being a legitimate delivery@mstarc56 @CricketAus @foxcricket @cricket7 pic.twitter.com/1gq7WJhT1f
— Ted Thorne (@ChuckUp5) December 26, 2025
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 152 धावांवर सर्व विकेट गमावल्या. या प्रत्युत्तरात उतरलेला इंग्लंडचा यावेळीही काही खास करू शकला नाही. अवघ्या 110 धावांवर डाव संपुष्टात आला. पहिल्या डावात यजमान ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 4 दावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 46 धावांची आघाडी आहे. सध्याची स्थिती पाहता हा सामना दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच संपेल असं वाटत आहे. कारण खेळपट्टी गवताळ असल्याने गोलंदाजांचा सामना करणं फलंदाजांना कठीण जात आहे.
