SA vs BAN : दक्षिण आफ्रिका संघाचा टॉस जिंकत बॅटींगचा निर्णय, कॅप्टनची एन्ट्री

SA vs BAN : वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना पार पडत आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

SA vs BAN : दक्षिण आफ्रिका संघाचा टॉस जिंकत बॅटींगचा निर्णय, कॅप्टनची एन्ट्री
| Updated on: Oct 24, 2023 | 2:24 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 23 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिब अल हसन हा फिट झाला असून आजच्या सामन्यामध्ये त्याच्याकडेच संघाच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. मात्र आफ्रिकेचा कर्णधार बावुमा या सामन्यालाही मुकला असून मारर्कमकडे संघाचं कर्णधारपद असणार आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना होणार असून बांगलादेश संघाने ४ पैकी अवघा एक सामना जिंकला आहे. तर आफ्रिकेचा संघ आपला चौथा विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेईल.  कारण पॉईंट टेबलमध्ये सर्वात जास्त रनरेट हा आफ्रिकेच्या संघाचा आहे.

बांगलादेश संघाला कमी लेखून चालणारन नाही, याआधीसुद्धा अनेकदा बांगलादेश संघाने अनेकवेळा आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत उलटफेर केला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड संघाने आफ्रिकेला पराभूत करत मोठा उलटफेर केला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (C), मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (W), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मारर्कम  (C), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स