SA vs IND 1st ODI: राहुल सोबत उद्या ओपनिंगला कोण येणार? महाराष्ट्राचा ऋतुराज की, शिखर धवन?

डरबन: उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे (Ind vs Sa odi) सीरीजला सुरुवात होत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी केएल राहुल (KL Rahul) संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. केएल राहुल उद्या मैदानात सलामीला उतरेल, त्यावेळी त्याच्यासोबत कोण सलामीचा जोडीदार असेल? त्याची उत्सुक्ता आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उद्या सलामीला उतरणार असल्याचे राहुलने सांगितलं आहे. कर्णधार म्हणून […]

SA vs IND 1st ODI: राहुल सोबत उद्या ओपनिंगला कोण येणार? महाराष्ट्राचा ऋतुराज की, शिखर धवन?
ऋतुराज गायकवाड
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 6:03 PM

डरबन: उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे (Ind vs Sa odi) सीरीजला सुरुवात होत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी केएल राहुल (KL Rahul) संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. केएल राहुल उद्या मैदानात सलामीला उतरेल, त्यावेळी त्याच्यासोबत कोण सलामीचा जोडीदार असेल? त्याची उत्सुक्ता आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उद्या सलामीला उतरणार असल्याचे राहुलने सांगितलं आहे. कर्णधार म्हणून रोहितची ही पहिली वनडे मालिका असणार होती. पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो मालिकेला मुकला आहे.

वनडेमध्ये रोहित शर्मासोबत दीर्घकाळापासून ओपनिंग करणाऱ्या शिखर धवनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. टी-20 मध्ये शिखरची सलामीची जागा राहुलने घेतली. त्यानंतर धवनने संघातले स्थानही गमावले. त्यामुळे उद्याच्या सामन्यात टीम शिखर धवनला पुन्हा संधी देणार की, महाराष्ट्राचा तरुण सलामीवीर ऋतुराज गायकवाडला संधी मिळेल.

ऋतुराज गायकवाड सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये

ऋतुराज गायकवाड सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. 2021च्या आयपीएल सीजनमध्ये त्याने सर्वाधिक धावा करताना त्याने चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावर्षी टी-20 आणि पुढच्यावर्षी वनडेचा वर्ल्डकप आहे. त्याआधी धवनला स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा संधी मिळू शकते.

सुर्यकुमार यादव की श्रेयस अय्यर

मधल्याफळीत सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर असताना ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेंकटेश अय्यरचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश होऊ शकतो. नेहमीप्रमाणे विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल. त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. कर्णधारपदाच्या जबाबदारीचं ओझं उतरल्यामुळे विराटच्या खेळात सुधारणा अपेक्षित आहे. नंबर चारच्या जागेसाठी श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव मध्ये स्पर्धा असेल. ऋषभ पंत पाचव्या स्थानावर येईल. वेंकटेश अय्यर डेब्यु करु शकतो.

उद्या असा असू शकतो भारतीय संघ केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत, आर.अश्विन, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह,

South Africa vs India, 1st ODI Predicted Playing XI: Shikhar Dhawan or Ruturaj Gaikwad to open with KL Rahul?

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.