Rishabh Pant| ‘नॅचरल खेळ वैगेर बकवास बंद करा’, गावस्कर ऋषभ पंतवर भडकले

| Updated on: Jan 05, 2022 | 4:51 PM

"क्रीजवर दोन नवीन फलंदाज आहेत आणि ऋषभ पंत असा फटका खेळतो. या फटक्यासाठी तुम्हाला कुठलही कारण देता येणार नाही"

Rishabh Pant| नॅचरल खेळ वैगेर बकवास बंद करा, गावस्कर ऋषभ पंतवर भडकले
Follow us on

डरबन: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg test) दुसऱ्या डावातही ऋषभ पंत (Rishabh Pant) अपयशी ठरला. तीन चेंडू खेळल्यानंतर भोपळाही न फोडता पंत तंबूत परतला. ऋषभ पंत ज्या पध्दतीने बाद झाला, ते महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना अजिबात आवडलं नाही. स्टेपआऊट होऊन पुढे येऊन फटका खेळताना ऋषभ पंत बाद झाला. रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने वेरेनकडे झेल दिला. (South Africa vs India Johannesburg test Rishabh Pant slammed by Sunil Gavaskar over shot selection)

थोडी तरी जबाबदारी दाखवायला पाहिजे होती

“क्रीजवर दोन नवीन फलंदाज आहेत आणि ऋषभ पंत असा फटका खेळतो. या फटक्यासाठी तुम्हाला कुठलही कारण देता येणार नाही. तो त्याचा नैसर्गिक खेळ आहे, वैगेरे बकवास बंद करा. थोडी तरी जबाबदारी दाखवायला पाहिजे होती” अशा शब्दात गावस्करांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला संताप व्यक्त केला.

ऋषभने बेजबाबदार फटक्याची निवड केली

ऋषभ पंतने पहिल्या डावात 17 धावा केल्या होत्या. सातत्याने टीकेचा सामना करणाऱ्या रहाणे आणि पुजाराने आज चांगली फलंदाजी केली. दोघांनी अर्धशतक झळकवताना 111 धावांची भागीदारी केली. दोघेही पाठोपाठ बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने जबाबदारी घेऊन खेळायला पाहिजे होते. कारण त्याच्याकडे आता बऱ्यापैकी अनुभव आहे. पण संघ अडचणीत असताना ऋषभने बेजबाबदार फटक्याची निवड केली व संघाला आणखी अडचणीत आणले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामन्यात ऋषभ पंत बॅटीने विशेष चमक दाखवू शकलेला नाही. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात आठ आणि दुसऱ्या डावात 34 धावांवर तो बाद झाला होता. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 27 धावांची माफक आघाडी मिळाली होती. दोन्ही संघांना कसोटी विजयाची समान संधी आहे. भारतासाठी कसोटी कुठल्यादिशेने जाणार ते सर्वस्वी फलंदाजांवर अवलंबून आहे.

संबंधित बातम्या: 

Sourav ganguly: सौरव गांगुलीनंतर आता त्याची मुलगी सनाही कोरोना पॉझिटिव्ह
IPL 2022: ‘नाम के हकदार पेहेले आप’, आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार
Ajinkya Rahane| करीअर संकटात सापडल्यानंतर रहाणे आणि पुजाराची बॅट तळपली

(South Africa vs India Johannesburg test Rishabh Pant slammed by Sunil Gavaskar over shot selection)