Retirement | धोनी-रैनानंतर आणखी एकाचा स्वातंत्र्य दिनी क्रिकेटला रामराम, टीमला झटका

Cricket Retirement | टीम इंडियाच्या महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या दोघांनी 15 ऑगस्टला निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूने क्रिकेटला अलविदा केला आहे.

Retirement | धोनी-रैनानंतर आणखी एकाचा स्वातंत्र्य दिनी क्रिकेटला रामराम, टीमला झटका
| Updated on: Aug 15, 2023 | 3:49 PM

मुंबई | देशभरात मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वात आगामी आशिया कप स्पर्धेची लगबग सुरु आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्याआधी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळने संघाची घोषणा केली आहे. तर टीम इंडिया, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 3 संघांची घोषणा केलेली नाही. या दरम्यान आता विराट कोहली याच्यासोबत खेळणाऱ्या खेळाडूने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांच्यानंतर 15 ऑगस्टला निवृत्ती घेणारा हा तिसरा खेळाडू ठरला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या दोघांनी आजच्या दिवशी 3 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

धोनी-रैना यांची 3 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य दिनी निवृत्ती

श्रीलंकेचा ऑलराउंडर आणि आयपीएलमध्ये विराट कोहली याच्यासोबत आरसीबीकडून खेळणारा वानिंदू हसरंगा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वानिंदू हसरंगा याच्या निवृत्तीबाबतच्या निर्णयाची माहिती आयसीसी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विटद्वारे दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हसरंगा याचा निर्णय स्वीकार केला आहे.

वानिंदू हसरंगा कसोटी क्रिकेटूमधून निवृत्त

निवृत्तीचं कारण काय?

व्हाईट बॉल क्रिकेटवर (टी 20 आणि वनडे) लक्ष केंद्रीत करण्यासाठी कसोटी क्रिकेटला फूल स्टॉप देण्याचा निर्णय वानिंदू हसरंगा याने घेतला आहे.

वानिंदू हसरंगा याची कसोटी कारकीर्द

वानिंदू हसरंगा याची कसोटी कारकीर्द औटघटकेची ठरली. वानिंदू याने 26 डिसेंबर 2020 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तर अखेरचा सामना 21 एप्रिल 2021 रोजी बांगलादेश विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. वानिंदू याने 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 1 अर्धशतकासह 196 धावा केल्या आहेत.