
भारतात सध्या आयपीएल 2025 स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी ट्राय सीरिजसाठी टीम जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंडिया वूमन्स टीममध्ये ट्राय सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. ऑलराउंडर चमारी अथापथु ही श्रीलंकेचं या त्रिसदस्यीय मालिकेत नेतृत्व करणार आहे. आयसीसीने यााबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंडिया या 3 संघांमध्ये या मालिकेत चुरस पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे या मालिकेच्या यजमानपदाचा मान आहे. या मालिकेत 3 संघांमध्ये एकूण 7 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ या मालिकेत 4-4 सामने खेळणार आहे. अव्वल 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 11 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हे आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे आयोजित करण्यात आले आहेत.
श्रीलंकेने याआधी नववर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय मालिका खेळली होती. न्यूझीलंडने या मालिकेत श्रीलंकेचा 2-0 ने धुव्वा उडवला होता. श्रीलंकेने त्या मालिकेनंतर टीममध्ये एकूण 8 बदल केले आहेत. तलेच मलकरी मदारा हीचा एकदिवसीय संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. मलकरी हीने न्यूझीलंड विरुद्ध टी 20 पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी होती. त्याच जोरावर श्रीलंकेला एकमेव विजय मिळवता आला होता.मलकरी हीने तेव्हा 14 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या.
त्रिसदस्यीय मालिकेचं वेळापत्रक
Chamari Athapaththu to lead Sri Lanka during the upcoming ODI tri-series at home against India and South Africa 💥
More 👉 https://t.co/nDkVFuoVPL pic.twitter.com/ec0JRMnQX4
— ICC (@ICC) April 24, 2025
वनडे ट्राय सीरिजसाठी वूमन्स श्रीलंका टीम : चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी सिल्वा, कविशा दिलहरी, अनुष्का संजीवनी, हसिनी परेरा, पियुमी वाथ्सला, मनुडी नानायककारा, देउमी विहंगा, इनोका रणवीरा, इनोशी फर्नांडो, हंसिमा करुणारत्ने, रश्मिका शिववंडी, मलकी मदारा, सुगंधिका कुमारी आणि अचीनी कुलसूरिया.