IND vs SL: गॉल कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेने टाकला डाव, पाच फिरकीपटूंसह निवडला असा संघ

भारतीय संघ श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी श्रीलंकेने आपल्या भात्यातील प्रमुख अस्त्र काढली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

IND vs SL: गॉल कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेने टाकला डाव, पाच फिरकीपटूंसह निवडला असा संघ
IND vs SL: गॉल कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेने टाकला डाव, पाच फिरकीपटूंसह निवडला असा संघ
Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Aug 12, 2026 | 3:22 PM

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यासाठी जोरदार सराव सुरू आहे. श्रीलंकेतील डावपेच आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन रणनिती आखली जात आहे. गॉल कसोटी सामन्याला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याच्या तीन दिवस आधीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ श्रीलंकन संघाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून होता. कोणत्या खेळाडूंची निवड होते आणि काय रणनिती आखता येईल याकडे लक्ष होतं. पण काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला संघाची घोषणा करण्यास अवधी लागला. आता गॉल कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली असून तीन वर्षानंतर निरोशन डिकवेला याची संघात निवड झाली आहे. कुसल मेंडिसच्या गैरहजेरीत संघाच्या विकेटकीपरची जबाबदारी सांभाळणार आहे.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने 12 ऑगस्टला आपल्या संघाची घोषणा केली आहे. यात प्रभात जयसूर्यासह पाच फिरकीपटू आहेत. त्यामुळे गॉलची खेळपट्टी काय असेल याचा अंदाज येतो. भारतीय संघाला फिरकीवर नाचवण्यासाठी श्रीलंकन संघ सज्ज झाला आहे. कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि उपकर्णधार कामिंदु मेंडिस हे देखील फिरकीची बाजू सांभाळतात. तसेच सराव सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या निशान मदुष्का यानेही निवड समितीची लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याचीही संघात निवड झाली आहे. त्याने भारताविरुद्ध सराव सामन्यात दोन्ही सामन्यात अर्धशतक ठोकलं होतं. सराव सामन्यात खेळणारे फिरकीपटू रमेश मेंडिस, सोनल दिनूषा आणि केशरा नुवंधा यांचीही निवड केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीसाठी भारतासारखीच श्रीलंकेची स्थिती आहे. श्रीलंकेलाही ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. त्यामुळे  या मालिकेसाठी श्रीलंकन संघही जोर लावत आहे. आता पहिल्या कसोटी सामन्यात काय निकाल लागतो? याकडे लक्ष आहे.

गॉल कसोटी सामन्यासाठी श्रीलंकन संघ : धनंजय डी सिल्वा (कर्णदार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंडु मेंडिस (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, पसिंदु सूरियाबंदारा, सोनल दिनूषा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशरा नुवंथा, मिलान रत्नायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, दिलशान मदुशंका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us