Rishabh Pant : आधी टीका-आता कौतुक, सुनील गावसकर पंतच्या शतकानंतर कॉमेंट्री करताना म्हणाले..

Sunil Gavaskar On Rishabh Pant Century : ऋषभ पंत याने कसोटी उपकर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध शतक झळकावलं. पंतच्या या खेळीनंतर दिग्गज सुनील गावसकर काय म्हणाले? जाणून घ्या.

Rishabh Pant : आधी टीका-आता कौतुक, सुनील गावसकर पंतच्या शतकानंतर कॉमेंट्री करताना म्हणाले..
Rishabh Pant And Sunil Gavaskar
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 21, 2025 | 8:44 PM

टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. पंतने या खेळीत जोरदार फटकेबाजी केली. पंतने हेडिंग्ले लीड्समध्ये 146 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्ससह शतक पूर्ण केलं. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे सातवं, इंग्लंडमधील तिसरं तर उपकर्णधार म्हणून पहिलं शतक ठरलं. पंतने शतक केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांसह कॉमेंट्री बॉक्समधील दिग्गजही आनंदी झाले.पंतला स्टुपिड म्हणणारे टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर स्वत:ला उपकर्णधाराचं कौतुक करण्यापासून रोखू शकले नाहीत. गावसकरांनी पंतच्या या खेळीचं तोंडभरून कौतुक केलं. गावसकरांनी काही महिन्यांपूर्वी पंतवर सडकून टीका केली होती. त्यामुळे गावसकरांच्या या कौतुकाचं विशेष महत्त्व आहे.

लिटिल मास्टरकडून पंतचं कौतुक

पंतने पहिल्या डावात अप्रितम कामगिरी केली. पंतने त्याच्या खेळीच्या सुरुवातीला थोडा वेळ घेतला आणि सेट झाल्यानंतर जोरदार फटकेबाजी केली. पंतने 100 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर एका हाताने षटकार खेचत शतक पूर्ण केलं. पंतच्या शतकानंतर गावसकरांनी 3 शब्दात कौतुक केलं. “सुपर्ब सुपर्ब सुपर्ब”, अर्थात शानदार, शानदार शानदार, असं गावसकर म्हणाले. गावसकरांचा पंतचं कौतुक करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गावसकरांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतच्या कामगिरीवरन टीका करताना प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

गावसकर काय म्हणाले होते?

पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही खास बॅटिंग करता आली नव्हती. पंत त्या दौऱ्यातील एका सामन्यात बेजबाबदारपणे शॉट मारुन आऊट झाला होता. त्यामुळे गावसकरांनी पंतवर निशाणा साधत “स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड”, असं म्हटलं होतं. गावसकरांनी पंतवर केलेल्या टीकेची तेव्हा जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. मात्र पंतने एका शतकासह गावसकरांना त्यांचं मत बदलायला भाग पाडलं.

गावसकरांनी कौतुक करणं पंतसाठी सन्मानाची बाब आहे. गावसकर माजी क्रिकेटर आणि कर्णधार आहेत. तसेच गावसकरांनी केलेल्या कौतुकामुळे पंतची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

पंतची झंझावाती खेळी

दरम्यान ऋषभ पंत याला पहिल्या डावात त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या करण्याची संधी होती. मात्र पंत त्यात अपयशी ठरला. पंतला दुसऱ्यांदा 150 पेक्षा अधिक धावा करण्याची संधी होती. मात्र पंत अपयशी ठरला. पंतने 178 बॉलमध्ये 12 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने 134 रन्स केल्या.