ENG vs IND : ऋषभ पंतचं सिक्ससह चाबूक शतक, टीम इंडियाची इंग्लंड विरुद्ध हॅटट्रिक
Rishabh Pant Century : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने उपकर्णधार म्हणून अप्रतिम सुरुवात केलीय. पंतने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कडक शतक ठोकलंय.

टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीही आपला दबदबा कायम ठेवत जबरदस्त सुरुवात केलीय. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने अप्रतिम सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या दिवशी शतक केलं. त्यानंतर आता पंतने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात खणखणीत षटकारासह चाबूक शतक पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह शतकाची हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच पंतने या शतकासह ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
पंतचं सातवं कसोटी शतक
शुबमन आणि पंतने दुसऱ्या दिवशी 85 षटकांनंतर 3 बाद 359 धावांपासून खेळाला सुरुवात केली. या जोडीने आक्रमक सुरुवात करत फटकेबाजी केली. पंतने या दरम्यान 1-2 धावांसह काही मोठे फटके मारले आणि शतकाच्या जवळ येऊन पोहचला. पंतला शतकासाठी फक्त 1 धाव हवी होती. तेव्हा पंतने 100 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कडक सिक्स ठोकून शतक पूर्ण केलं. पंतने 146 बॉलमध्ये 71.92 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. पंतच्या या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे सातवं तर इंग्लंडमधील तिसरं शतक ठरलं. पंतने लीड्सआधी इंग्लंडमध्ये ओव्हल आणि बर्मिंघममध्ये शतक केलं होतं.
धोनी आणि गिलचा रेकॉर्ड ब्रेक
पंतने यासह आजी माजी कर्णधारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. पंतने शुबमन गिल आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना मागे टाकलं. पंतने कसोटी शतकांबाबत धोनी आणि गिल यांना मागे टाकलं. गिल आणि धोनी या दोघांच्या नावावर कसोटीत प्रत्येकी 6-6 शतकांची नोंद आहे.
भारताचा सर्वात यशस्वी विकेटकीपर
पंतने शतकासह इतिहास घडवला. पंत कसोटीत टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकं करणारा पहिला विकेटकीपर ठरला. पंतने याबाबतीत धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला.पंतने सर्वात वेगवान 76 डावात सातवं शतक केलं. तर धोनीने 144 डावात 6 शतकं केली होती.
पंतचं इंग्लंडमधील तिसरं कसोटी शतक
A maximum to get to his century in style 💯
3rd Test Hundred in England for vice-captain Rishabh Pant 👏👏
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/txmdcvSrfS
— BCCI (@BCCI) June 21, 2025
चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी
दरम्यान शुबमन आणि पंत या दोघांनी चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 221 धावांवर यशस्वी जैस्वालच्या रुपात तिसरी वेकट गमावली होती. त्यानंतर शुबमन आणि पंत या जोडीने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 209 धावांची भागीदारी केली. भारताने कॅप्टन गिलच्या रुपात चौथी विकेट गमावली. गिलने 227 बॉलमध्ये 19 फोर आणि 1 सिक्ससह 147 रन्स केल्या.
