AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav Happy Birthday: सूर्या म्हणजे चालतं-फिरतं वादळ, पठ्ठ्याचे हे टॉप 5 तगडे रेकॉर्ड पाहाच

Suryakumar Yadav Happy Birthday : सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये काही तगडे रेकॉर्ड केले आहेत.  आज सूर्याचा वाढदिवस असून त्याच्या या तगड्या रेकॉर्डवर एक नजर माराच.

Suryakumar Yadav Happy Birthday: सूर्या म्हणजे चालतं-फिरतं वादळ, पठ्ठ्याचे हे टॉप 5 तगडे रेकॉर्ड पाहाच
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 14, 2023 | 6:54 PM
Share

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने क्रिकेच जगतात आपली वेगळी ओळख तयार केलीये. गडी एकदा सेट झाला की विषयच संपला, बॉलरने कुठेही बॉल टाकला तर हा गडी आस्मान दाखवल्याशिवाय राहत नाही. अल्टी, पल्टी आणि पिचवर खाली पडून कडक शॉट खेळणाऱ्या सूर्याची दहशतच टी-20 क्रिकेटमध्ये झाली आहे. सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये काही तगडे रेकॉर्ड केले आहेत.  आज सूर्याचा वाढदिवस असून त्याच्या या तगड्या रेकॉर्डवर एक नजर माराच.

सूर्यकुमारने आपल्या अंतरगी क्रिकेटिंग शॉट्समुळे अनेक सामने एकहाती जिंकले आहेत. टी- 20 क्रिकेटमध्ये 52 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 12 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला आहे. विराट कोहली या यादीमध्ये 15 पुरस्कारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादव हा टी-2- मधील सर्वात विध्वंसक फलंदाज मानला जातो. तो एकाच चेंडूवर अनेक शॉट्स खेळू शकतो. त्याने 53 सामन्यात 172.70 च्या स्ट्राईक रेटने 1841 धावा केल्या आहेत. तो केवळ 1000 धावांच्या बाबतीतच नाही तर करिअरच्या स्ट्राइकरेटच्या बाबतीतही अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.

एकाच डावात सूर्याने सर्वाधिक चौकार मारले आहेत. 10 जुलै 2022 रोजी त्याने 117 धावा केल्या होत्या. या इनिंगमध्ये त्याने 14 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. सूर्याने 31 डावांमध्ये हा कामगिरी केली आहे. या यादीत विराट पहिल्या स्थानी असून त्याने 27 तर दुसऱ्या स्थानी असलेल्या के. एलने 29 डावांमध्ये कामगिरी केलीये.

दरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानी फलंदाजीला येत 111 धावांची खेळी करणारा सू्र्या एकमेव खेळाडू आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...