IND vs JPN Cricket match: भारत-जापान ऐतिहासिक क्रिकेट लढत! जापानी राजदूतांनी सामन्याला दिलं खास नाव

भारत आणि जपान यांच्यात 'सुझुकी कप' अंतर्गत केवळ एकच टी20 सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हे दोन्ही संघ मैदानावर आमनेसामने येत असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

| Updated on: Sep 17, 2026 | 4:47 PM
1 / 5
भारत जापान हा ऐतिहासिक सामना 22 सप्टेंबर रोजी जपानमधील 'सानो' या शहरात खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता थेट पाहता येईल.  (Photo: X)

भारत जापान हा ऐतिहासिक सामना 22 सप्टेंबर रोजी जपानमधील 'सानो' या शहरात खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता थेट पाहता येईल. (Photo: X)

2 / 5

या महत्त्वाच्या सामन्याच्या आधी भारतातील जपानचे राजदूत ओनो केइची यांनी भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतली आणि खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. (Photo: X)

3 / 5

टीम इंडियाच्या भेटीनंतर जापानी राजदूत ओनो केइची कमालीचे प्रभावित झाले. त्यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवर या सामन्याला ‘दोस्तीची नवी इनिंग’ असे एक नवीन आणि भावनिक नाव दिले, जे दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक आहे. (Photo: X)

4 / 5

दोन्ही देशांमधील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य आणि देवाणघेवाण वाढवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी एका विशेष बैठकीत ‘स्पोर्ट 75’ या मोहिमेची घोषणा केली होती. हा टी20 सामना याच मोहिमेअंतर्गत टाकलेले पहिले मोठे पाऊल आहे. (Photo: X)

5 / 5

बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी या सामन्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या सामन्याच्या माध्यमातून क्रिकेट हा खेळ जपानसारख्या देशात पोहोचेल आणि एका संपूर्णपणे नवीन प्रेक्षकवर्गाला या खेळाकडे आकर्षित करण्यात मदत होईल. (Photo: X)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us