
टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये आज संध्याकाळी आठ वाजता सामना होणार आहे. या सामन्याच्या रूपाने टीम इंडिया सुपर 8 फेरीमधील आपला पहिला सामना खेळत आहे. हा सामना बार्बाडोस येथील किंग्स्टन ओव्हल येथे होणार आहे. टीम इंडियाची कामगिरी या मैदानावर खराब राहिली आहे. आतापर्यंत टीम इंडियाने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अफगाणिस्तान टीमही आता तुल्यबळ मानली जाते. खासकरून टी-20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान टीमने मोठे उलटफेर करत सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये भारताची फलंदाजीने काहीशी निराशा केली आहे. गोलंदाजांनी तिन्ही सामन्यात चमकदार कामगिरी करत टीम इडियाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यात सामनावीर म्हणून बुमराहला गौरवण्यात आलं. खासकरून बुमराहने पाकिस्तानच्या सामन्यात आपली छाप सोडलेली दिसली. मात्र फलंदाजीमध्ये स्टार खेळाडू विराट कोहलीला अद्यापही दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे.
रोहित शर्मा आजच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता आहे. टीममध्ये एक मोठी बदल झाला तर तो मोहम्मद सिराज याच्या जागी स्पिनर कुलदीप यादव याला संधी देऊ शकतो. गेल्या तीन सामन्यात वेगवान गोलंदाजांमध्ये सिराजला अवघी एकच विकेट घेता आली आहे. त्यामुळे टीममध्ये बदल झाला तर हा बदल होऊ शकतो.
कुलदीप यादव याला खेळवण्यामागे दुसरं कारण म्हणजे बार्बाडोसच्या या मैदानावर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. यंदाच्या वर्ल्ड कपमधील शेवटची मॅच याच मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झाली होती. या सामन्यामध्ये ॲडम झाम्पा याने महत्त्वाच्या दोन विकेच घेत दमदार गोलंदाजी केली होती. या सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आज कुलदीप यादव याला खेळवू शकते.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.