प्रेमप्रकरणातून महाल परिसरात वाहनांची तोडफोड! सात जणांना अटक
नागपूरच्या महाल परिसरात प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादामुळे मंगळवारी रात्री 12 ते 15 दुचाकींची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात जणांना अटक केली असून, त्यापैकी काही अल्पवयीन आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतरांचा शोध सुरू आहे. परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नागपूरमधील महाल परिसरात प्रेमप्रकरणातून झालेल्या वादामुळे 12 ते 15 दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या अलीकडच्या गल्ल्यांमध्ये हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स-गर्लफ्रेंडने दुसऱ्या व्यक्तीशी मैत्री केल्याने दोन गटांमध्ये वाद झाला. या वादातूनच वाहनांची तोडफोड करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही तरुण चेहऱ्याला स्कार्फ बांधून आणि शस्त्र घेऊन शिवीगाळ करत तोडफोड करताना दिसले. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे, ज्यात काही अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

