T20 WC: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिका टेन्शनमध्ये! रिकल्टनच्या हेल्मेटला चेंडू लागला आणि…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेने झिम्बाब्वेला 5 गडी राखून पराभूत केलं. यासह एकही सामना न गमावता उपांत्य फेरी गाठली आहे. पण सुपर 8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकन संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

T20 WC: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिका टेन्शनमध्ये! रिकल्टनच्या हेल्मेटला चेंडू लागला आणि...
T20 WC: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिका टेन्शनमध्ये! रिकल्टनच्या हेल्मेटला चेंडू लागला आणि...
Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 01, 2026 | 8:05 PM

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची विजयी घोडदौड सुरू आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला होता. तसेच या स्पर्धेत त्यांची कामगिरीही जबरदस्त राहिली आहे. आता दक्षिण अफ्रिकन संघ जेतेपदापासून दोन पावलं दूर आहे. दक्षिण अफ्रिकेचा सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेशी झाला. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 5 विकेटने जिंकला. असं असताना उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकन संघाला धक्का बसला आहे. कारण टॉप ऑर्डरमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा फलंदाज रायन रिकल्टन या दुखापत झाली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेगवान आखुड टप्प्याचा चेंडू खेळताना त्याला हेल्मेटवर जोरात आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्यावर व्रण उठले होते. यावरून हा चेंडू किती जोरात लागला असेल याचा अंदाज येतो.

झिम्बाब्वेचा संघ या सामन्यापूर्वीच स्पर्धेतून आऊट झाला होता. तर दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली होती. पण या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न झिम्बाब्वेचा होता. विजयी धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ सुरूवातीला अडखळला. असं असताना धावगती वाढवण्याच्या प्रयत्न रायन रिकल्टन होता. त्यासाठी आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्नात होता. पण वेगवान गोलंदाज ब्रॅड एवन्सच्या एका चेंडूवर जोरदार प्रहार करताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. पुल शॉट मारताना चुकला आणि हा प्रकार घडला. यानंतर रिकल्टन काही काळ अस्वस्थ दिसला. त्याने तात्काळ हेल्मेट काढलं आणि त्याचा माथा लाल झाल्याचं दिसला. हे निशाण चेंडू लागल्याने झालं होतं. त्यामुळे 5 ते 6 मिनिटं खेळ थांबवावा लागला.

दक्षिण अफ्रिकेचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी त्याची तपासणी केली. त्याची कनकशन टेस्ट झाली आणि त्याला खेळण्याची पुन्हा परवानगी दिली गेली. नियमानुसार, त्याचं हेल्मेट बदललं गेलं. त्यानंतर पुढच्या षटकात एवन्स आणि रिकल्टन पुन्हा आमनेसामने आले. तेव्हा त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.. त्यानंतर दुसरा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला. यासाठी रिकल्टन तयार होता.. या चेंडूवरही त्याने षटकार मारला. पण पाचव्या चेंडूवर टाकलेला बाउंसर पुन्हा षटकार मारण्याच्या नादात विकेट टाकली. रायन बर्लने त्याचा झेल पकडला. रिकल्टने 22 चेंडूत 4 षटकार मारत 31 धावा केल्या.

Follow Us