WT20 World Cup मन जिंकलं आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूने, अखेरपर्यंत एकटी लढली पण तिची झुंज ठरली अपयशी

आफ्रिका संघाची सुरूवात खराब राहिली नाही. मात्र सलामीवीर लॉरा वॉलवॉर्ड्ट हिने एक बाजू लावून धरली  होती. दुर्देवाने तिची झुंज अपयशी ठरली.

WT20 World Cup मन जिंकलं आफ्रिकेच्या या खेळाडूने, अखेरपर्यंत एकटी लढली पण तिची झुंज ठरली अपयशी
| Updated on: Feb 26, 2023 | 11:02 PM

केपटाऊन : टी-20 वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पार पडला. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने त्यांचा 19 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलिया संघाने सामना पूर्णपणे एकतर्फी करून घेतला. यजमान आफ्रिका संघाची सुरूवात खराब राहिली नाही. मात्र सलामीवीर लॉरा वॉलवॉर्ड्ट हिने एक बाजू लावून धरली  होती.

संघाची बिकट अवस्था असताना लॉरा वॉलवॉर्ड्टनं एकाकी झुंज सुरु ठेवली होती. मात्र 48 चेंडूनत 61 धावा करून बाद झाली आणि संघाच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तिने 48 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या.  मात्र दुर्देवाने तिची झुंज अपयशी ठरली.

ऑस्ट्रेलियाने वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. या स्पर्धेत विजयी घोडदौड पहिल्या सामन्यापासून सुरु ठेवली ती अखेरपर्यंत साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलँडला 97 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 173 धावांचं आव्हान दिलं होतं. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात बांगलादेशनं 7 गडी गमवून 107 धावांचं आव्हान दिलं होतं.

हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून 18.2 षटकात पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं 20 षटकात 8 गडी गमवून 112 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने बिनबाद 15.5 षटकात पूर्ण केलं. चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी आणि 21 चेंडू राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात 6 गडी गमवून 124 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून 16.3 षटकात पूर्ण केलं.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा करू शकला.

ऑस्ट्रेलियाचा संघ – एलिसा हिली, बेथ मूनी, अशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग, एलिसे पेरी, जॉर्जिया वारेहम, ताहिला मॅकग्राथ, जेस जोनास्सेन, मेगन स्कट, डार्सी ब्राउन

दक्षिण आफ्रिका संघ – लॉरा वॉलवॉर्ड्ट, ताझमिन ब्रिट्स, मरिझेन कॅप्प, सुने ल्यूस, क्लोइ ट्रायन, नादिन डी क्लर्क, अन्नेक बॉश, सिनालो जाफ्ता, शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा