ICC कडून T20 वर्ल्ड कपची बेस्ट प्लेइंग 11 जाहीर, टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना स्थान

इंग्लंडची टीम T20 चॅम्पियन बनल्यानंतर आयसीसीने टीम ऑफ द टुर्नामेंट जाहीर केली आहे.

ICC कडून T20 वर्ल्ड कपची बेस्ट प्लेइंग 11 जाहीर, टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना स्थान
jos buttler
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 14, 2022 | 2:19 PM

मेलबर्न: इंग्लंडने पाकिस्तानला हरवून T20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेटने विजय मिळवला. इंग्लंडची टीम T20 चॅम्पियन बनल्यानंतर आयसीसीने टीम ऑफ द टुर्नामेंट जाहीर केली आहे. या टीममध्ये वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडच्या चार प्लेयर्सना संधी मिळालीय. भारत आणि पाकिस्तानच्या 2-2 खेळाडूंना या टीममध्ये स्थान मिळालय. झिम्बाब्वेच्याही एका प्लेयरला या टीममध्ये स्थान मिळालय.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्याही प्रत्येकी एका प्लेयरला या टीममध्ये स्थान मिळालय. भारतीय टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा 12 वा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

टी 20 वर्ल्ड कप प्लेइंग इलेव्हनमध्ये इंग्लंडचे 4 खेळाडू

आयसीसीच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनची कॅप्टनशिप जोस बटलरला देण्यात आली आहे. त्याने टुर्नामेंटमध्ये 225 धावा केल्या. एलेक्स हेल्सला सुद्धा प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालय. त्याने टुर्नामेंटमध्ये 212 धावा केल्या. इंग्लंडच्या 2 गोलंदाजांना टीममध्ये स्थान मिळालय. सॅम करन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 6 मॅचमध्ये त्याने 13 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय मार्क वुडने 4 मॅचमध्ये 9 विकेट काढले.

विराट-सूर्यकुमारचाही सन्मान

भारताकडून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोन खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालय. विराट कोहलीने टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक 296 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 239 धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राइक रेट 189.68 चा होता.

पाकिस्तानकडून शादाब, शाहीनचा टीममध्ये समावेश

पाकिस्तानकडून लेग स्पिनर शादाब खानचा आयसीसी बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय. शादाबने 7 मॅचमध्ये 11 विकेट घेतल्या. त्याने बॅटनेही चांगलं योगदान दिलं. शाहीन शाह आफ्रिदीने 7 मॅचेसमध्ये 11 विकेट घेतल्या. त्यालाही टीममध्ये स्थान दिलय.

आयसीसीची बेस्ट टी20 वर्ल्ड कप टीम: जोस बटलर (कॅप्टन), एलेक्स हेल्स, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रजा, शादाब खान, सॅम करन, एनरिक नॉर्खिया, मार्क वुड, शाहीन शाह आफ्रिदी.