IND vs SA: अर्शदीप नको सांगत होता, रोहितने काही ऐकलं नाही, आणि मग असं घडलं VIDEO

IND vs SA: रोहित शर्माने अर्शदीपच का ऐकलं नाही?

IND vs SA: अर्शदीप नको सांगत होता, रोहितने काही ऐकलं नाही, आणि मग असं घडलं VIDEO
Arshdeep singh
| Updated on: Oct 30, 2022 | 7:34 PM

पर्थ: अर्शदीप सिंह T20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. पाकिस्तान नंतर आता त्याने दक्षिण आफ्रिकेलाही प्रारंभीच्या ओव्हर्समध्ये झटके दिले. अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर क्विंटन डि कॉकला आऊट केलं. याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने राइली रुसौला बाद केलं. रुसौ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याच ओव्हरमध्ये कॅप्टन रोहित शर्माने अर्शदीपची एक गोष्ट ऐकली नाही. त्याने मना करुनही रिव्यू घेतला.

काय घडलं त्या ओव्हरमध्ये ?

दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने रुसौ विरोधीत LBW च अपील केलं. अंपायरने रुसौला नाबाद ठरवलं. अर्शदीपने सांगितलं की, बॉल लेग साइडला खाली राहिला. अर्शदीप निराश दिसला. पण रोहितच मत दुसरं होतं. अर्शदीपने रिव्यू ने घेण्याचा सल्ला दिला. पण रोहित ऐकला नाही. त्याने रिव्यू घेतला. रोहितने दिनेश कार्तिक बरोबर चर्चा केली.

रोहित बरोबर होता

रोहितचा रिव्यू घेण्याचा निर्णय योग्य ठरला. रुसैौ फटका खेळताना चुकला. चेंडू थायवर लागला होता. रिप्लेमध्ये चेंडू मिडल आणि लेग स्टम्पला लागणार हे दिसत होतं. रोहितच्या अनुभवामुळे अर्शदीपच्या खात्यात एकाच ओव्हरमध्ये दुसरी विकेट जमा झाली.

अपवाद सूर्यकुमार यादवचा

टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याच्यासह टीमच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. अपवाद फक्त सूर्यकुमार यादवचा. नेहमीप्रमाणे आजही एकटा सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना नडला. त्याने 68 धावा केल्या. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 134 धावांच लक्ष्य दिलं आहे.