
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान यूएसए क्रिकेट टीमने कॅनडा विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. यूएसएने विक्रमी धावांचा पाठलाग करत विजय मिळवला आहे. कॅनडाने यूएसएला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. यूएसएने हे आव्हान 17.4 ओव्हरमध्ये 3 विकेटस गमावून पूर्ण केलं. यूएसएने 197 धावा केल्या. अँड्रिज गॉस-आरोन जोन्स ही जोडी यूएसच्या विजयाची शिल्पकार ठरली. अँड्रिज गॉस-आरोन जोन्स या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची निर्णायक भागीदारी रचली. अँड्रिज गॉस याने 65 धावांची खेळी केली. तर आरोन जोन्स याने 40 बॉलमध्ये 94 धावांची नाबाद खेळी केली.
यूएसएची 195 धावांचा पाठलाग करताना फ्लॉप सुरुवात झाली. स्टीव्हन टेलर झिरोवर आऊट झाला. त्यानंतर यूएसएने 42 धावा असताना कॅप्टन मोनाक पटेल याची विकेट गमावली. त्यानंतर अँड्रिज गॉस आणि आरोन जोन्स या दोघांनी शतकी भागीदारी रचून यूएसएचा विजय निश्चित केला. गॉसने 46 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 65 धावा केल्या. तर आरोन जोन्सने 40 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 94 रन्स केल्या. कॉरी एंडरसन याने नाबाद 3 धावांचं योगदान दिलं. तर कॅनडाकडून कलीम सामान, निखील दत्ता आणि डिलन हेलिगर या तिंघाच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दरम्यान त्याआधी यूएसएने टॉस जिंकून कॅनडाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. कॅनडाकडून दोघांनी अर्धशतकी खेळी केली. नवनीत धालीवाल आणि निकोलस कर्टन या दोघांनी अर्धशतक ठोकलं. नवनीतने 31 बॉलमध्ये 51 धावा केल्या. तर निकोलसने 44 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं.श्रेयस मोव्वाने अखेरच्या क्षणी 16 बॉलमध्ये 32 धावांची तुफानी खेळी केली. तर एरोन जॉन्सनने 23 आणि दिलप्रीत सिंहने 11 धावांचं योगदान दिलं. यूएसएकडून अली खान, हरमीत सिंह आणि कॉरी एंडरसन या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
यूएसएचा 7 विकेट्सने शानदार विजय
A marathon 131-run stand between Aaron Jones and Andries Gous power USA to an opening day victory over Canada 👊#T20WorldCup | 📝 #USAvCAN: https://t.co/xvy3gvUUKt pic.twitter.com/XcH1qTRMTa
— ICC (@ICC) June 2, 2024
यूएसए प्लेईंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अली खान आणि सौरभ नेत्रवाळकर.
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस कर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत सिंग, निखिल दत्ता, डिलन हेलिगर, कलीम साना आणि जेरेमी गॉर्डन.