
मेलबर्न: भारत आणि पाकिस्तामध्ये (IND vs PAK) आज टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) महामुकाबला रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्न (Melbourne) क्रिकेट ग्राऊंडमध्ये हा सामना होईल. ही मॅच कोण जिंकणार? ते पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. पण त्याआधी हे मैदान कसं आहे? इथे कुठल्या टीमला फायदा होऊ शकतो? मेलबर्नवर विजयाचा फॉर्म्युला काय आहे? ते समजून घेऊया.
या मैदानाचा रेकॉर्ड कसा आहे?
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या टीमला नेहमी फायदा होतो. या मैदानाचा रेकॉर्डच असा आहे. एमसीजीवर आतापर्यंत 18 सामन्यात 10 वेळ पाठलाग करणारी टीम जिंकली आहे. फक्त 7 मॅचमध्येच प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला संधी मिळाली आहे.
या मैदानातील सरासरी धावसंख्या काय?
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी 20 चा सरासरी स्कोर 139 धावा आहे. सेकंड इनिंगमध्ये सरासरी स्कोर 127 आहे. म्हणजे इथे फलंदाजी करणं इतकही सोपं नाही. गोलंदाजांना इथे मदत मिळते. त्यामुळे सावध सुरुवात आवश्यक आहे.
सर्वाधिक धावा टीम इंडियाच्याच
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये सर्वाधिक धावा भारतीय टीमनेच केल्या आहेत. 2016 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 184 रन्स केल्या होत्या. या मॅचमध्ये विराट कोहली, रोहित शर्माने अर्धशतकं झळकावली होती.
तेच या मैदानावर सर्वाधिक कमी धावसंख्या टीम इंडियाचाच आहे. 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा डाव 74 धावात आटोपला होता. मेलबर्नवर टीम इंडियाची कामगिरी बऱ्यापैकी आहे. त्यांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे.