AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 2nd Test | दुष्काळात तेरावा महिना! दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी

SA vs IND 2nd Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विजयाच्या शोधात असताना एक वाईट बातमी समोर आली आहे.

IND vs SA 2nd Test | दुष्काळात तेरावा महिना! दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी
Team india vs south africa secod test Match
| Updated on: Dec 31, 2023 | 7:36 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीला होणार आहे. हा सामना  केप टाऊन येथे पार पडणार असून टीम इंडियासाठी करो या मरो असा असणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला होता. या पराभवाचा बदला घेत टीम इंडिया नवीन वर्षाची विजयाने सुरूवात करण्यासाठी सज्ज आहे. मात्र दुसऱ्या कसोटीआधी एक वाईट बातमी समोर आली आहे.

नेमकं काय झालं?

टीम इंडिया विजयासाठी उत्सुक आहे, वर्ल्ड कप फायनल गमावल्यावर सीनिअर खेळाडूंनी खेळलेल्या पहिल्याच सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यासाठी जखमी वाघ जिंकण्याच्या तयारीत असताना स्टार ऑल राऊंडर शार्दुल ठाकूरला नेटमध्ये फलंदाजी करताना खांद्याला दुखापत झाली आहे. खांद्याला बॉल लागला त्यानंतरही ठाकूर याने फलंदाजी सुरू ठेवली.

शार्दुल ठाकूर थ्रोडाऊनमधून चेंडूंचा सराव करत होता, विक्रम राठोड यांनी फेकलेला चेंडू त्याच्या खांंद्याला लागला. सराव सत्र सुरू झाल्यावर अवघ्या 15 मिनिटांमध्येच त्याला दुखापत झाली. पहिल्या कसोटीमध्ये संघाचा भाग असलेला शार्दुल दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.