
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी मँचेस्टरमध्ये भारतीय फलंदाजांकडून जोरदार झुंज पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या जोडीने आश्वासक सुरुवात करुन दिली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी इंग्लंडची आघाडी मोडीत काढण्यात निर्णायक भूमिका बजावली. दोघांनी टी ब्रेकपर्यंत नाबाद शतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं करत भारताला 11 धावांची आघाडी मिळवून दिली. या दरम्यान रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली. जडेजाने इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरण्याचा बहुमान मिळवला. जडेजाने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.
जडेजाने 86 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 27 वं तर इंग्लंड विरुद्ध या मालिकेतील पाचवं अर्धशतक पूर्ण केलं. जडेजाने त्याआधी 31 वी धाव पूर्ण करताच इतिहास घडवला. जडेजा यासह इंग्लंडमध्ये 1 हजार धावा करण्यासह 30 विकेट्स घेणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला. जडेजाने याआधीच 30 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर जडेजाने 1 हजार धावा करताच मोठा कीर्तीमान केला.
इंग्लंडमधील खेळपट्टी कायम वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली आहे. मात्र जडेजाने अशा प्रतिकूल परिस्थितीतही जडेजाने ही कामगिरी केली. त्यामुळे जडेजाच्या या कामगिरीचं विशेष महत्त्व आहे. तसेच जडेजा कसोटीत इंग्लंडमध्ये सहाव्या किंवा त्याखालील स्थानी बॅटिंगसाठी येत 1 हजार धावा करणारा गॅरी सोबर्स यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत या तिघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 358 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने प्रत्युत्तरात 669 धावा केल्या. इंग्लंडसाठी पहिल्या डावात जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स या दोघांनी शतकी खेळी केली. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे इंग्लंडला 311 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात इंग्लंडने भारताला चौथ्या दिवशीच 2 फलंदाजांना भोपळाच फोडू दिला नाही. त्यामुळे टीम इंडियावर चौथ्याच दिवशी पराभवाची टांगती तलवार होती. मात्र केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल या दोघांनी चौथा दिवस खेळून काढला.
केएल आणि शुबमनने पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 188 रन्स जोडल्या. त्यानंतर 34 धावांनी इंग्लंडने भारताला चौथा झटका दिला. शुबमन गिल 103 धावांवर बाद झाला. त्यानंतर सुंदर आणि जडेजा जोडीने टी ब्रेकपर्यंत नॉट आऊट 100 रन्सची पार्टनरशीप केली.